मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘मिफ’ २०१८ मध्ये माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन पटांसाठी प्रवेशिका आमंत्रित करण्यात येत आहेत. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाºया फिल्म्स डिव्हिजनतर्फे या द्वैवार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१८ या काळात मुंबईत हा महोत्सव होणार आहे.१ सप्टेंबर २०१५ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत निर्मिलेल्या ४५ मिनिटांपर्यंतचे माहितीपट आणि लघुपट आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा गटातील प्रवेशासाठी पात्र असतील. अॅनिमेशन पटांसाठी वेळेची मर्यादा नाही. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०१७ आहे. अधिक माहिती महोत्सवाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. १५ व्या मिफसाठी पुरस्काराची रोख रक्कम दुप्पट म्हणजे ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करण्यात आली आहे.महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात सर्वोत्तम ठरणाºया माहितीपटाला रोख रकमेसह प्रतिष्ठेचा सुवर्णशंख पुरस्कार देण्यात आला. आंतरराष्ट्रीय गटात सर्वोत्तम लघुपटाला (४५ मिनिटांपर्यंत) आणि सर्वोत्तम अॅनिमेशनपटाला प्रत्येकी५ लाख रुपये आणि रजत शंख पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मनिष देसाई यांनी दिली.>असे असेल स्पर्धेचे स्वरूप...राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या गटात माहितीपटासाठी ६० मिनिटांवरील आणि ६० मिनिटांपेक्षा कमी असे दोन विभाग आहेत. दोन्ही विभागांसाठी पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये आणि रजत शंख असे आहे. सर्वोत्तम लघुपट आणि सर्वोत्तम अॅनिमेशनपटासाठी तीन लाख रुपये आणि रजत शंख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रमोद पाती विशेष परीक्षक पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात दिला जाईल.महाराष्ट्र सरकारचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शकाला दिला जाईल. आयडीपीए (भारतीय माहितीपट निर्माता संघ) चषक, रोख रकमेच्या पुरस्कारासह विद्यार्थ्याने केलेल्या सर्वोत्तम चित्रपटाला दिला जाईल. सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि साउंड डिझाइन या क्षेत्रात तांत्रिक पुरस्कार दिले जातील. स्पर्धा गटातल्या पुरस्कारांचा निर्णय पाच सदस्यांच्या आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाकडून आणि राष्ट्रीय परीक्षक मंडळाकडून घेतला जाईल.
लघुचित्रपटकारांसाठी ‘मिफ’ची पर्वणी, माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन पटांसाठी प्रवेशिका आमंत्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 2:16 AM