चित्रपट निर्मात्याच्या पत्नीला बेड्या

By admin | Published: November 11, 2016 05:54 AM2016-11-11T05:54:59+5:302016-11-11T05:54:59+5:30

बॉलीवूड निमाता झोयेब स्प्रिंगवाला यांच्या पत्नी कल्पना (५५) यांना २२ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी भांडुप पोलिसांनी गजाआड केले आहे

The filmmaker's wife is bound | चित्रपट निर्मात्याच्या पत्नीला बेड्या

चित्रपट निर्मात्याच्या पत्नीला बेड्या

Next

मनीषा म्हात्रे, मुंबई
बॉलीवूड निमाता झोयेब स्प्रिंगवाला यांच्या पत्नी कल्पना (५५) यांना २२ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी भांडुप पोलिसांनी गजाआड केले आहे. एमसीएच्या नोंदणीकृत चाय गरम प्रायव्हेट लिमिटेडच्या त्या संचालिका ंआहेत. अटकेमुळे बिथरलेल्या कल्पनांनी भांडुप पोलीस ठाणे आणि मुलुंड दंडाधिकारी न्यायालयातही गोंधळ घातला. मात्र, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
पटियाला हाउस, जाने कहासे आई है अशा चित्रपटांचे निर्माते असलेले झोयेब हे कल्पनासोबत बोरीवली परिसरात राहतात. कल्पना यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. भांडुप येथील एका व्यापाऱ्याने तीन महिन्यांपूर्वी त्यांच्याकडून २२ लाखांचा माल मागविला होता. व्यापाऱ्याने पैसे भरताच कल्पना यांच्याकडून मालाची डिलिव्हरी व्यापाऱ्याकडे आली. मात्र, कपड्यांऐवही रिकामी खोके हाती लागल्याने व्यापारीही चक्रावला. त्यांनी तत्काळ विचारणा केली. मात्र, कल्पना यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वाटेत माल चोरीला गेला असल्याचे कारण पुढे करत त्यांनी हात झटकले. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, व्यापाऱ्याने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी कल्पना यांच्याविरोधात भादंवि कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे, म्हणून कल्पना यांना भांडुप पोलिसांनी वेळोवेळी समन्स धाडले होते. मात्र, आपली काहीच चुकी नाही, असा पवित्रा घेत, आपण पोलीस ठाण्यात का हजर राहावे, असा उलट सवाल करत त्यांनी पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिला. आतापर्यंत ५ ते ६ समन्स पाठवूनही त्या हजर झाल्या नाही. अखेर तीन महिन्यानी बुधवारी सायंकाळी पाच वाजता वांद्रे येथून अटक केल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली.

Web Title: The filmmaker's wife is bound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.