आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:10 AM2021-09-05T04:10:28+5:302021-09-05T04:10:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेची अंतिम गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर ...

Final merit list of students for ITI admission announced | आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेची अंतिम गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. गुणवत्ता यादीत समाविष्ट उमेदवारांना मेसेजद्वारे गुणवत्ता क्रमांक संचालनालयाकडून कळविण्यात आला आहे. यात १०० गुण मिळवणाऱ्या तब्बल १०० विद्यार्थ्यांनी आयटीआयला पसंती दर्शविली आहे. सोमवारी प्रवेशाच्या पहिल्या यादीत विद्यार्थ्यांना कुठे प्रवेश मिळाला, हे समजणार आहे.

शनिवारी जाहीर झालेल्या यादीतील विद्यार्थ्यांना लॉग-इन केल्यानंतर आपला गुणवत्ता क्रमांक किती आहे, हे समजणार आहे. त्याचबरोबर गुणवत्ता यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता क्रमांक एसएमएसच्या माध्यमातूनही कळविण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता प्रथम फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी संस्थेत उपस्थित राहून कार्यवाही करावी लागणार आहे. शनिवारअखेर प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना ७ सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार असल्याची माहिती व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी दिली. यंदा आयटीआयसाठी राज्यातून २ लाख ५८ हजार ६९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज भरले आहेत. काही मागणी असलेल्या जागांसाठी गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही मोठी चुरस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Final merit list of students for ITI admission announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.