८० ते ९० क्लस्टर्समधून अंतिम वर्षाची परीक्षा; सराव प्रश्नपत्रिकाबाबत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 03:18 AM2020-09-19T03:18:52+5:302020-09-19T03:19:16+5:30
८० - ९० क्लस्टर्समध्ये अंदाजे बीए, बीकॉम, बीएस्सीचे ४२, एज्युकेशनचे ११, लॉचे ८, इंजिनीअरिंगचे ९, आर्किटेक्चर आणि फार्मसीचे प्रत्येकी ३, फाईन आटर््सचे २ अशा क्लस्टर्सचा समावेश असणार आहे.
मुंबई : इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, स्पेशल एज्युकेशन, लॉ, बीए, बीकॉम, बीएस्सी, फाईन आटर््स अशा अभ्यासक्रमाचे एकूण ८० ते ९० लीड महाविद्यालयाच्या क्लस्टर्समधून मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पार पडणार आहेत.
प्रत्यक क्लस्टरमध्ये संबंधित अभ्यासक्रमाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जवळपास असणाऱ्या ८ ते ९ महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाºया सराव प्रश्नपत्रिका या लीड क्लस्टर्स महाविद्यालयांकडून त्यांच्या अंतर्गत येणाºया महाविद्यालयांना आणि मग विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
८० - ९० क्लस्टर्समध्ये अंदाजे बीए, बीकॉम, बीएस्सीचे ४२, एज्युकेशनचे ११, लॉचे ८, इंजिनीअरिंगचे ९, आर्किटेक्चर आणि फार्मसीचे प्रत्येकी ३, फाईन आटर््सचे २ अशा क्लस्टर्सचा समावेश असणार आहे. महाविद्यालयांकडून दिव्यांग तसेच अंध विद्यार्थ्यांसाठीही आवश्यक ती लेखनिकांची सोय करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आॅनलाइन परीक्षेसाठी जे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे ते सुरक्षित असावे, सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना वापराच्या दृष्टीने सुलभ असावे, नेटवर्क गेले तर विद्यार्थी आहे तिथेच येईल अशी सुविधा असावी, अशा सूचना विद्यापीठाने क्लस्टर्स आणि त्यातील महाविद्यालयांना केल्या आहेत.
सराव प्रश्नपत्रिकाबाबत संभ्रम
अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी देण्यात येणाºया प्रश्नपत्रिकांसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. सराव २५ सप्टेंबरपासून बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. मात्र अद्याप विद्यार्थ्यांच्या हातात ना प्रश्नपत्रिका आहेत, ना वेळापत्रक यामुळे सराव प्रश्नपत्रिका या विद्यापीठाकडून येणार की संबंधित महाविद्यालयांकडून हा प्रश्न विद्यार्थी सातत्याने विचारत आहेत.