मंत्रालयात साफसफाईचे काम मिळाले नाही म्हणून प्यायला फिनाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:13+5:302021-07-15T04:06:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मंत्रालयात साफसफाईचे काम मिळाले नाही म्हणून नैराश्येत एका व्यक्तीने जवळील फिनाईल प्राशन केल्याची घटना ...

Finale to drink as the ministry did not get a cleaning job | मंत्रालयात साफसफाईचे काम मिळाले नाही म्हणून प्यायला फिनाईल

मंत्रालयात साफसफाईचे काम मिळाले नाही म्हणून प्यायला फिनाईल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मंत्रालयात साफसफाईचे काम मिळाले नाही म्हणून नैराश्येत एका व्यक्तीने जवळील फिनाईल प्राशन केल्याची घटना मंगळवारी मंत्रालय परिसरात घडली. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

ओमप्रकाश जंगम (३६) असे संबंधित व्यक्तीचे नाव असून तो महाडचा रहिवासी आहे. तो टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय करतो. कोरोनामुळे सारे काही ठप्प झाले. अशात मंत्रालय परिसरात साफसफाईचे काम मिळेल म्हणून सोबत फिनाईलची बॉटल घेऊन मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो मंत्रालय परिसरात आला. मात्र तेथेही काम मिळाले नाही. याच नैराश्येत त्याने फिनाईल पिण्याचा प्रयत्न केला. ही बाब तेथील पोलिसांच्या निदर्शनास येताच त्याला तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत साफसफाईचे काम मिळाले नाही. याच तणावात नागरिकांचे लक्ष वेधण्याची धडपड करत असताना फिनाईल तोंडात गेल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवत त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली.

Web Title: Finale to drink as the ministry did not get a cleaning job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.