- खलील गिरकर मुंबई : विविध कारणांनी दुबईत गेलेल्या व कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प झाल्याने तिथेच अडकलेले शेकडो कोकणी महाराष्ट्रीयन नागरिक नुकतेच तीन विशेष विमानांनी मुंबईत दाखल झाले. कोकणी नागरिकांना मुंबईमध्ये परतण्यासाठी विमाने उपलब्ध होत नसल्याने युनायटेड कोकण या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून तीन विशेष विमानांची सुविधा उपलब्ध करून दिली.या माध्यमातून सुमारे दोनशे प्रवासी मायदेशी परतले. सबीना शेख, दिलावर दलवाई, खालीद मुकादम यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. मुख्तार पालेकर, नौशाद पटेल, नजीर हुरझुक यांचेही यामध्ये सहकार्य लाभले.
दुबईमध्ये भारतातून विशेषत: कोकणातून नव्वद हजाराहून अधिक नागरिक कामानिमित्त व व्यापारानिमित्त स्थायिक आहेत. मार्चपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंद असल्याने कामासाठी, कामाच्या शोधासाठी व इतर घरगुती कारणांमुळे व्हिजिट व्हिसावर दुबईत गेलेले नागरिक तिथे अडकले आहेत.
‘वंदे भारत मिशन’अंतर्गत दुबईतून येणाºया विमानांची संख्या कमी असल्याने या प्रवाशांच्या समस्येत आणखी वाढ झाली. काही रुग्णांना, गरोदर महिलांना मुंबईत परतायचे होते. काही जणांच्या कुटुंबीयांचे निधन झाल्याने त्यांना घरी यायचे होते. मात्र नेमका लॉकडाऊन सुरू झाल्याने त्यांना रोजगार मिळू शकला नाही. त्यांना मायदेशी परतण्याची संधीही मिळत नव्हती. त्यामुळे या नागरिकांना मायदेशी मुंबईत परतण्यासाठी विशेष विमानांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विडा युनायटेड कोकणच्या या सक्रिय कार्यकर्त्यांनी उचलला.
...अन् चेहºयावर पसरले समाधान
आपापली नोकरी, उद्योग सांभाळत सामाजिक दायित्व म्हणून या सर्वांनी आवश्यक त्या सर्व पातळीवर प्रयत्न करून तीन विमानांची सुविधा उपलब्ध करण्यात शेवटी यश मिळवले. या माध्यमातून सुमारे दोनशे नागरिक मुंबईत परतले. मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या चेहºयावर समाधान व आनंद पसरले. याबाबत सबीना शेख म्हणाल्या, दुबईत विविध कारणांमुळे अडकलेल्या कोकणी नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी आम्हाला मदत करता आली याचे आम्हाला समाधान आहे. अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी अशा प्रकारे इतरांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन शेख यांनी केले.