अखेर आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:42 AM2017-08-19T05:42:07+5:302017-08-19T05:42:09+5:30

तरुणीचा दुचाकीवरून पाठलाग करत, अश्लील शेरेबाजी करणा-या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, अवघ्या दोन तासांत अटक केली.

Finally, the accused escaped with the police | अखेर आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात

अखेर आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Next

मुंबई : असीरा तरन्नुम (२५) या तरुणीचा दुचाकीवरून पाठलाग करत, अश्लील शेरेबाजी करणा-या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, अवघ्या दोन तासांत अटक केली. हे दोघे पाठलाग करत असताना, तरुणीने त्यांचा फोटो काढून पोलिसांना टिष्ट्वट केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
क्लीफर्ड सॅम्युएल सुशी अमाना (२५), सागर सिंग (२१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते मरोळचे रहिवासी आहेत. अमाना हा विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षात, तर सिंग हा वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे पाठलाग करत असताना, घाबरलेल्या स्थितीतदेखील असीराने त्यांचा फोटो काढून टिष्ट्वट केला. या फोटोत दोघांपैकी एकाचा चेहरा दिसत असला, तरी दुचाकीचा क्रमांक ५९९४ इतकाच दिसत होता. अर्धवट नंबरप्लेटवरून आरोपीचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर, युद्धपातळीवर या प्रकरणी परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त परमजीतसिंह देहिया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक, एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे दया नायक आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही आणि खबºयाचे तगडे नेटवर्क वापरत, नायक यांनी अंधेरीच्या मरोळमधून अमाना आणि गुप्ता यांना शुक्रवारी अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
असीरा मीडिया प्रोफेशनमध्ये असून, बुधवारी रात्री अंधेरीच्या चित्रकूट स्टुडिओकडून रिक्षाने घरी जात होती. त्या वेळी सिंग व त्याचा मित्र स्कूटरवरून तिचा पाठलाग करत होते. तिने त्यांचे फोटो काढूनर् पोलिसांना टिष्ट्वट केल्यानंतर, पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले. त्यांना पाहताच दोघेही पसार झाले होते.
>मजेसाठी पाठलाग : अटक केल्यानंतर निव्वळ मजेसाठी आपण असीराचा पाठलाग केल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस त्यांच्या मागावर आहेत, याबाबतही ते अनभिज्ञ होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करणे, हे त्यांच्यासाठी धक्कादायक ठरल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

Web Title: Finally, the accused escaped with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.