अखेर अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 04:55 AM2019-06-19T04:55:58+5:302019-06-19T06:54:57+5:30
आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; १ जुलै रोजी जाहीर होणार सर्वसाधारण गुणवत्ता यादी
मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्ब्ल ९ दिवसांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जारी करण्यात आले असून, १९ ते २३ जून, २०१९ विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. याच दरम्यान विद्याथ्यार्नी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स, तसेच एमसीव्हीसीसाठी अद्याप अर्जाचा पहिला भाग भरला नाही, त्यांनाही तो भरता येणार आहे. बायफोकलची पहिली गुणवत्ता यादी २५ जून रोजी, तर साधारण गुणवत्ता १ जुलै आणि पहिली गुणवत्ता यादी ६ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीचे वेळापत्रक उपसंचालक कार्यालयाकडून यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कनिष्ठ आणि नामांकित महाविद्यालयांतील ७० टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, महाविद्यालये अकरावीचे नियमित वर्ग सुरू करू शकतात, तसेच एकत्र वर्ग घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी कनिष्ठ महाविद्यालयांची असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. वेळापत्रकाच्या मध्ये कनिष्ठ महाविद्यालये त्यांच्याकडील व्यवस्थापन आणि इनहाउस कोट्यातील जागा केव्हाही समर्पित करू शकतात, तर अल्पसंख्यांक महाविद्यालये त्यांचा अल्पसंख्यांक कोटा तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर समर्पित करू शकणार आहेत.
असे आहे वेळापत्रक
१९ ते २३ जून, २०१९ - बायफोकल प्रवेश: अर्ज, पसंतीक्रम भरणे, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचेही अर्ज भरणे.
महाविद्यालयांनी कोट्यातील प्रवेश पूर्ण करणे.
बायफोकल वगळता इतर शाखांचे आॅनलाइन प्रवेश अर्ज सादर करणे
१९ ते २९ जून, २०१९ - सायंकाळी ५ वाजेपर्यंत - सर्व शाखा आणि बायफोकल यामध्ये भाग १ आणि भाग २ अर्ज भरणे.
२५ जून, २०१९- ६ वाजता - बायफोकलची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार.
२६ आणि २७ जून, २०१९ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ - बायफोकल विषयाच्या पहिल्या यादीतील आॅनलाइन प्रवेश घेणे
१ जुलै, २०१९- सकाळी ११ वाजता - सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर.
२ ते ३ जुलै २०१९- सकाळी १० ते सायंकाळी ५ - अर्जाची पुनर्तपासणी करणे आणि हकरती नोंदविणे.
६ जुलै, २०१९ - सकाळी ११ - पहिली गुणवत्ता यादी.
८ जुलै ते ९ जुलै, २०१९ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ - पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
१० जुलै, २०१९ - सकाळी ११ ते ३ - पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
१० जुलै, २०१९ - ७ वाजता - रिक्त जागांचा तपशील.
११ आणि १२ जुलै २०१९ - सकाळी ११ ते सायंकाळी ५ - अर्जाचा भाग भरण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध
१५ जुलै, २०१९ - संध्याकाळी ६ - दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे.
१६ जुलै, १७ जुलै, २०१९- सकाळी ११ ते सायंकाळी ५ - दुसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
१८ जुलै, २०१९ - सकाळी ११ ते ३ - दुसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
१८ जुलै, २०१९ - ७ वाजता - रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.
१९ ते २० जुलै, २०१९ - सकाळी ११ ते ५ पर्यंत - अर्जाचा भाग - १ आणि भाग २ भरण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध.
२३ जुलै, २०१९- संध्याकाळी ६ - तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करणे.
२४ जुलै आणि २५ जुलै, २०१९- सकाळी ११ ते सायंकाळी ५ - तिसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
२६ जुलै, २०१९ - सकाळी ११ ते ३ - तिसºया गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेणे.
२६ जुलै, २०१९ - संध्याकाळी ७ वाजता - रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे आणि दुसºया फेरीचा कटआॅफ जाहीर करणे.
२७ जुलै, २०१९ - सकाळी ११ ते ५ - अजार्चा भाग - आणि भाग २ भरण्यासाठी दुसºया भागातील दुरुस्तीसाठी उपलब्ध.
३१ जुलै, २०१९- संध्याकाळी ६ वाजता - विशेष गुणवत्ता यादी जाहीर करणे.
१ आणि २ आॅगस्ट, २०१९ - सकाळी ११ ते ५ पर्यंत - विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश.
३ आॅगस्ट, २०१९ - सकाळी १० - रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.
२०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता अकरावीच्या जागांत नवीन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्याकडून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार आर्ट्स शाखेत एकूण ११५३ जागांची, कॉमर्स शाखेत ४२२६ जागांची तर सायन्स शाखेत १२४३ जागांची वाढ प्रस्तावित असल्याची माहिती मिळत आहे. एकूणच २०१९-२० या शैक्षणिक वर्षात अकरावीसाठी एकूण ६६२२ जागांची वाढ प्रस्तावित आहे.
शाखा % प्रस्तावित वाढणाऱ्या जागा अनुदानित विनाअनुदानित / स्वयंअर्थसाहाय्यित
आर्ट्स ८ ११५३ ११०३ ५०
कॉमर्स ८ ४२२६ २८७५ १३५१
सायन्स ५ १२४३ ९५३ २९०
एकूण ६६२२ ४९३१ १६९१