शिवसैनिकांना अखेर जामीन

By admin | Published: October 22, 2016 01:25 AM2016-10-22T01:25:32+5:302016-10-22T01:25:32+5:30

मुलुंड शिवसेना-भाजपा राडा प्रकरणात अटकेत असलेल्या १६ शिवसैनिकांना अखेर शुक्रवारी जामीन मंजूर झाला. यातील ९ जण हे जवळपास ८ ते ११ दिवस पोलीस कोठडीत होते.

Finally, bail for Shiv Sainiks | शिवसैनिकांना अखेर जामीन

शिवसैनिकांना अखेर जामीन

Next

मुंबई : मुलुंड शिवसेना-भाजपा राडा प्रकरणात अटकेत असलेल्या १६ शिवसैनिकांना अखेर शुक्रवारी जामीन मंजूर झाला. यातील ९ जण हे जवळपास ८ ते ११ दिवस पोलीस कोठडीत होते.
दसऱ्याच्या दिवशी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी आयोजिलेल्या पालिकेच्या भ्रष्टाचाररूपी रावण दहनावरून दोघांमध्ये वाद झाला. या दरम्यान झालेल्या राड्यात पोलिसांनी सेनेविरुद्ध गुन्हा दाखल करून सुरुवातीला पाच जणांना अटक केली. त्यापाठोपाठ आणखी ९ जणांना अटक केली. उपशाखाप्रमुख सुनील गारे, नीलेश ठक्कर, किरण नांदे, नीलेश सावंत, किशोर भोईर, उपविभागप्रमुख अनंत म्हाब्दी, जगदीश शेट्टी, माजी उपविभागप्रमुख महेंद्र वैती, शाखाप्रमुख अविनाश बागुल, दीपक सावंत, बाबा भगत, आनंद मुंडे, महेश चवरे, माजी शाखाप्रमुख दिनेश जाधव यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच पोलिसांनी संजय जाधव आणि अनिकेत येरुणकरलाही अटक केली आहे. अखेर अटकेतील १६ जणांच्या जामीन अर्जावरील शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने त्यांची प्रत्येकी १५ हजारांच्या जामिनावर सुटका केली. (प्रतिनिधी)

Web Title: Finally, bail for Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.