Join us  

अखेर बरसला...

By admin | Published: July 03, 2014 2:32 AM

जून महिना कोरडा घालविल्यानंतर पावसाने बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. दिवसभरात ठाणे शहरात ८९ मिमी पावसाची नोंद झाली

ठाणे : जून महिना कोरडा घालविल्यानंतर पावसाने बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. दिवसभरात ठाणे शहरात ८९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातही सकाळी ११ ते दुपारी १ वा. या दोन तासात ६३ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, या थोड्याशा पावसानेही पालिकांच्या कामांना उघडे पाडले आहे. ठाणे शहरातील अनेक मुख्य मार्गांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीचा ठाणेकरांना सामना करावा लागला. तर जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे झालेल्या ७० टक्के पेरण्यांना जीवदान मिळाले. तर उर्वरित ३० टक्के पेरण्यांना गती मिळाली आहे. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच दमदार पावसात ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांचेही पितळ उघडे पडले आहे. पावसाच्या तडाख्याने शहरातील अल्मेडा रोड, चंदनवाडी, डॉ. मूस रोड, शिवाजीपथ तसेच ठाणे स्टेशन परिसरात पाणी तुंबले. इंदिरा नगर येथे एमआयडीसीची संरक्षक भिंत कोसळली.