Join us

अखेर ‘ते’ बडे अधिकारी सुटले

By admin | Published: February 20, 2015 1:08 AM

विश्रामगृहात आढळल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ शाखा अभियंत्यांना निलंबित केले असले तरी या प्रकरणी बडे अधिकारी कसे सुटले याबाबत विभागात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांच्या तब्बल २४५ मोजमाप पुस्तिका (एमबी) वांद्रे येथील विभागाच्या विश्रामगृहात आढळल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ शाखा अभियंत्यांना निलंबित केले असले तरी या प्रकरणी बडे अधिकारी कसे सुटले याबाबत विभागात उलटसुलट चर्चा सुरू आहे.उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. ज्या अधिकाऱ्यांच्या पाचपेक्षा जास्त एमबी आढळल्या त्यांना निलंबित केले; पण त्यापेक्षा कमी एमबी असलेल्या शाखा अभियंत्यांना का वाचविण्यात आले, असा प्रश्न आता केला जात आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सेवानिवृत्तांचाही समावेश आहे! पाचपेक्षा कमी एमबी असलेल्या दोन अधिकाऱ्यांचे संबंध मंत्रालयात विभागातील काही बाबूंशी असल्याचे म्हटले जाते. नाशिकमध्ये ओल्या पार्टीप्रकरणी चार अभियंत्यांना निलंबित करण्यात आले; पण या पार्टीचे आयोजन करण्यात पुढाकार घेतलेल्या बड्या अधिकाऱ्याला मात्र अभय देण्यात आले. मालेगावच्या या कार्यकारी अभियंत्याने पार्टीचे आमंत्रण देण्यापासून पुढाकार घेतला होता. मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या बंगल्यावर आदल्या दिवशी झालेल्या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात गिफ्ट गोळा करण्यात आल्या होत्या. या पार्टीसाठी एका अभियंत्याने मेहनत घेतली. ३१ तारखेच्या ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात जळगावचे एक अधीक्षक अभियंता अत्यंत सक्रिय होते. पण बळी मात्र लहान अधिकाऱ्यांचा गेला. (विशेष प्रतिनिधी)एमबी घेऊन फिरतात कंत्राटदारबांधकाम विभागातील एमबींचा प्रवास हा शाखा अभियंता ते कार्यकारी अभियंता असा नियमानुसार झाला पाहिजे पण, राज्यातील बहुतेक कार्यालयांमध्ये आपापली बिले लवकर निघावीत म्हणून कंत्राटदारच एमबी घेऊन फिरत असतात. चार-दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी एमबीमध्ये पारदर्शकता आणण्याची गरज असल्याचे विभागातील चांगल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.