अखेर समीर वानखेडेंचा जन्मदाखला समोर आला; पत्नी क्रांती रेडकरनं केला ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 09:21 PM2021-11-17T21:21:27+5:302021-11-17T21:22:29+5:30
Kranti Redkar Tweet : समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव नसून दाऊद आहे असा मलिकांनी केला. या आरोपाला चोख उत्तर देत समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आज समीर वानखेडे यांचा जन्मदाखला ट्विट करत समीर वानखेडे यांच्या वडिलांचं ज्ञानदेव हे नाव अधोरेखित केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे गेल्या महिनाभरापासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांची जात आणि धर्मावरून तसेच त्यांच्या वडिलांच्या नावावरून गंभीर आरोप करण्यात येत होते. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव नसून दाऊद आहे असा मलिकांनी केला. या आरोपाला चोख उत्तर देत समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आज समीर वानखेडे यांचा जन्मदाखला ट्विट करत समीर वानखेडे यांच्या वडिलांचं ज्ञानदेव हे नाव अधोरेखित केले आहे.
नुकतेच मुंबई एनसीबीने गुप्त माहितीच्याआधारे नांदेड जिल्ह्यात तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच २ जणांना अटक केली. यानंतर एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने या कारवाईनंतर चोख प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती रेडकर यांनी वृत्तसंस्था एएनआयच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर करत “ना रुकेंगे, ना थमेंगे”, असे ट्विट पोस्ट केलं आहे. यातून क्रांतीने समीर वानखेडेंवर आरोप करणाऱ्या टीकाकरांना चोख उत्तर दिले होते.
THE ORIGINAL BIRTH CERTIFICATE OF SHRI SAMEER DNYANDEV WANKHEDE. I HAVE UNDERLINED MY FATHER IN LAWS NAME FOR CLARITY. pic.twitter.com/Gx2yNIqe2m
— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) November 17, 2021
तसेच समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी आता माझा मुलगा, मुलगी, पत्नी, बायको, नातू यांची नावं घेऊन, पहिलं लग्न, दुसरं लग्न असे आरोप करणे थांबवावे. आता प्रश्न आहे ड्रग्सचा. तर तुमच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात माझ्या मुलाने अटक केली, म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करत आहात. मात्र तुम्ही जे काही आरोप करताय, त्याचे पुरावे कृपया तुम्ही न्यायालयात सादर करा, दाद मागा. मात्र आमची बदनामी करू नका, असे आव्हानही ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांना दिले होते. त्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिकांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून त्यावर सुनावणी सुरु आहे.