मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांवर पसरलेले धूरके मंगळवारी निवळल्याचे चित्र होते. ‘ओखी’ वादळाचा विपरित परिणाम, अवकाळी पाऊस, धुके आणि धूळ यांचे मिश्रण, या सा-यांचा परिणाम म्हणून शनिवार, रविवार आणि सोमवारी मुंबई आणि नवी मुंबई परिसरावर धूरक्याची चादर जमा झाली होती. सोमवारी वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी झाल्यानंतर धूरके काही प्रमाणात कमी होत होते. मंगळवारी मात्र मुंबईवरची धूरक्याची चादर पूर्णत: कमी झाली. तर गारठा वाढला आहे.मुंबईतील धूरके निवळल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. दुसरीकडे मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात होत असलेली घट कायम आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतला गारठा वाढत आहे. बुधवारसह गुरुवारी कमाल आणि किमान तापमानातील घट कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी, वाढत्या थंडीने मुंबईकरांना आणखी हुडहुडी भरणार आहे.किमान तापमान २१ अंश सेल्सिअसमुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारसह गुरुवारी सकाळी काही प्रमाणात मुंबईवर धुके जमा होईल. दुपारनंतर आकाश मोकळे होईल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९, २१ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल. तर राज्यातील कमाल आणि किमान तापमानात नोंदविण्यात येत असलेले चढ-उतार कायम असून, येत्या ७२ तासांसाठी वातावरणातील बदल कायम राहतील.नवी मुंबई अजूनही धूरक्यातचमुंबई शहर आणि उपनगरातील धूरके विरले असले तरी नवी मुंबईवरील धूरके अजूनही कायम आहे. मुंबईच्या वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईवरील धुरक्याची चादर दूर झाली आहे. तर नवी मुंबईतील वातावरणातील धुळीचे प्रमाण कायम आहे. परिणामी येथील धूरके कायम आहे. दरम्यान, सफरच्या नोंदीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता ठीक आहे.हवेची गुणवत्ता(पार्र्टिक्युलेटमॅटरमध्ये)भांडुप - ३८बोरिवली - ८०मालाड - ४४अंधेरी - ११८बीकेसी - १७३चेंबूर - ५२वरळी - ३६माझगाव - ९७कुलाबा - ६८नवी मुंबई - २७८(स्त्रोत : सफर)
अखेर मुंबईवरील धूरक्याची चादर विरली, गारठा मात्र वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 2:17 AM