अखेर बीएसएनएल कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:50 AM2019-12-31T03:50:44+5:302019-12-31T03:51:04+5:30
नोव्हेंबरचे वेतन आज तर डिसेंबरचे १५ जानेवारीला
मुंबई : एकीकडे नागरिक २०१९ ला निरोप देऊन २०२० चे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले असताना भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) मधील कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काचे वेतन मिळवण्यासाठी सरकारकडे डोळे लावून वाट पाहण्याची वेळ आली आहे. बीएसएनएल कर्मचाºयांना नोव्हेंबरचे वेतन मंगळवार ३१ डिसेंबरला तर डिसेंबरचे १५ जानेवारीला मिळणार आहे.
बीएसएनएलच्या कॉर्पोरेट कार्यालयाकडून निधी जमा करण्यात आला असून मंगळवारी कर्मचारी व अधिकाºयांना नोव्हेंबरचे वेतन मिळेल, अशी माहिती बीएसएनएलतर्फे देण्यात आली. तर, डिसेंबरचे वेतन १५ जानेवारीला मिळण्याची शक्यता आहे. वेळेवर वेतन होत नसल्याने बीएसएनएल व एमटीएनएलच्या कर्मचारी, अधिकाºयांनी स्वेच्छानिवृत्ती योजनेला मोठा प्रतिसाद दिला असून किमान निवृत्तिवेतन तरी वेळेवर मिळेल अशी या कर्मचारी अधिकाºयांना आशा आहे.
एमटीएनएल कर्मचारी व अधिकाºयांचेही नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. हे वेतन ४ जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पत्र आले आहे, असेही वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात येत आहे. मात्र जेव्हा खात्यामध्ये वेतन जमा होईल तोपर्यंत काही खरे नाही, असा सूर कर्मचाºयांमधून उमटत आहे.