Join us

अखेर चौथ्या दिवशी ९२ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लस; सर्वाधिक लसीकरण राजावाडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 10:28 PM

गेल्या शनिवारपासून मुंबईतील लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम दोन दिवस स्थगित केल्यानंतर पुन्हा मंगळवारपासून सुरू करण्यात आली.

मुंबई - घराजवळच्या केंद्रात लसीकरण, कर्मचाऱ्यांचे समुपदेशन अशा पालिकेच्या काही प्रयोगांना अखेर यश आले आहे. लसीकरणाच्या चौथ्या दिवशी ३५३९ म्हणजेच ९२ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेण्यासाठी हजेरी लावली. सर्वाधिक लसीकरण जोगेश्वरी येथील ट्रॉमा सेंटर आणि घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात झाले.

गेल्या शनिवारपासून मुंबईतील लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे ही मोहीम दोन दिवस स्थगित केल्यानंतर पुन्हा मंगळवारपासून सुरू करण्यात आली. मात्र कोविन ॲपमधील गोंधळ, कर्मचाऱ्यांमध्ये भीती आदींमुळे दररोज चार हजार कर्मचाऱ्यांना लस देण्याची मोहीम फोल ठरत होती. त्यामुळे तीन दिवसांत केवळ पाच हजार २५१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते. 

त्यामुळे लसीकरणाविषयीची कर्मचाऱ्यांमधील भीती घालवण्यासाठी पालिकेने समुपदेशन सुरू केले. त्याचबरोबर नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही केंद्रावर लस घेण्याची सूट देण्यात आली. याचे चांगले परिणाम चौथ्या दिवशी दिसून आले. शुक्रवारी ३८५२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी बोलावण्यात आले होते. यापैकी तीन हजार ५३९ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. 

लसीकरणात ४० टक्क्यांची वाढ...

पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी एक लाख २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी कोविन ॲपवर झाली आहे. मात्र पहिल्या दिवशी १६ जानेवारी रोजी चार हजार कर्मचाऱ्यांपैकी १९२६ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. तर दुसऱ्या दिवशी १५९७ आणि तिसऱ्या दिवशी १७२८ आरोग्य कर्मचारी लस घेतली. मात्र शुक्रवारी कसे कळणार तब्बल ४० टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे दिसून आले.

शुक्रवारी झालेले लसीकरण

रूग्णालय....कर्मचारी

केईएम  - ६८५

सायन  - ३०१

कूपर  -  ३६८

नायर  - ३७८

व्ही. एन. देसाई  - ७२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय - ५७२

राजावाडी - ५१७

वांद्रे कुर्ला संकुल लसीकरण केंद्र - ३५०

भाभा रुग्णालय - २७१

जे. जे. रुग्णालय - २५  

एकूण   - ३५३९

टॅग्स :कोरोनाची लसमुंबई महानगरपालिकाआरोग्य