Join us

अखेर एसटी गणवेशाचा मुहूर्त मिळाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 5:20 AM

मुंबई : प्रलंबित असलेल्या एसटी गणवेशाच्या वाटपाला एसटी महामंडळाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

मुंबई : प्रलंबित असलेल्या एसटी गणवेशाच्या वाटपाला एसटी महामंडळाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ६ जानेवारी २०१८ रोजी विभागीय स्तरावर ‘नवीन गणवेश वितरण सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश राज्यातील सर्व विभागांना देण्यात आले आहे. परिपत्रकानुसार ३१ विभागांना आणि ३ कार्यशाळा मिळून ३४ विभागांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये खर्च करण्याची मान्यतादेखील देण्यात आली आहे.मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात गुरुवारी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत गणवेश वितरण सोहळ्याचा निर्णय घेण्यात आला. एसटी मुख्यालयातील विभागीय भांडार अधिकाºयांकडून १ जानेवारी रोजी प्रत्येकी २० गणवेश घ्यावेत. यात १० चालक आणि १० वाहक वर्गातील गणवेश असून ५ महिला वाहकांचे गणवेश घ्यावे. ६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता विभागीय कार्यालयात गणवेश वितरण करावे, अशा मार्गदर्शक सूचना परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत.