अखेर लोअर परळ पूल पादचाऱ्यांसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 04:59 AM2018-07-28T04:59:56+5:302018-07-28T05:00:17+5:30

पुलावरील बॅरिकेटिंगचे काम पूर्ण

Finally the Lower Parel Pool opened to the pedestrians | अखेर लोअर परळ पूल पादचाऱ्यांसाठी खुला

अखेर लोअर परळ पूल पादचाऱ्यांसाठी खुला

Next

मुंबई : प्रशासकीय यंत्रणेच्या चालढकलीनंतर अखेर लोअर परळ पूल पादचाºयांसाठी शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास खुला करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी स्थानिक राजकीय नेत्यांसह महापालिका आणि रेल्वे अधिकाºयांनी पुलाची पाहणी करत रेल्वे अधिकाºयांनी पूल खुला करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महापालिकेकडून होत असलेल्या बॅरिके टिंगच्या कामामुळे शुक्रवारी सकाळी खुला होणारा पूल रात्री उशिरा पादचाºयांसाठी खुला करण्यात आला. यामुळे काही अंशी तरी मुंबईकरांना दिलासा मिळाला .
महापालिकेच्या जी-दक्षिण विभाग क्षेत्रातील पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्टेशनजवळ ना. म. जोशी मार्ग (डिलाईल पूल) व गणपतराव मार्ग यांना जोडणारा पूल वाहतुकीसह पादचाºयांसाठी महत्त्वाचा आहे. पूल बंद केल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्व प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे मुंबईकरांना हाल सहन करावे लागले.

आज रेल्वे मुख्यालयात बैठक
पुलाच्या निष्कासनासाठी कंत्राटदाराच्या नेमणुकीसाठी शनिवारी रेल्वे मुख्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत पुलाचे पाडकाम, आवश्यक ब्लॉक, नवीन पुलाचा आरखडा याबाबत निर्णय होणार आहे.
दरम्यान महापालिका, रेल्वे यांच्या अनियोजिततेमुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना वेठीस धरल्याने त्यांच्यात प्रचंड संताप होता. गुरुवारी पुलाच्या पाहणीदरम्यान दोन राजकीय पक्षांमध्ये निर्माण झालेला वाद, प्रवाशांमधील संभ्रम आणि प्रशासनाने ठोस भूमिका न घेतल्याने उडालेला गोंधळ यामुळे प्रवाशांच्या संतापात अधिक भर पडली.

Web Title: Finally the Lower Parel Pool opened to the pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.