अखेर गोरेगावातील पादचारी पूलावर छप्पर बसविण्याच्या कामाला ‘मुहूर्त’
By admin | Published: May 16, 2017 01:02 AM2017-05-16T01:02:57+5:302017-05-16T01:02:57+5:30
गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेला आणि फलाटाला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पूलावर छप्पर घालण्याबाबत अखेर पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाला जाग आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेला आणि फलाटाला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पूलावर छप्पर घालण्याबाबत अखेर पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाला जाग आली आहे. याठिकाणी छप्पर घालण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याबाबत ५ एप्रिलला ‘लोकमत’ने ‘पादचारी पूल छपरविना’ या शिर्षकान्वये वृत्त दिले होते. प्रशासनाने त्याची दखल घेत दोन दिवसापूर्वी कामाला सुरवात केली.
गोरेगाव स्थानकावर चर्चगेटच्या दिशेने असलेला सदर पादचारी पूल छपराविना आहे. दररोज हजारो प्रवासी आणि पादचारी येथील उघड्या पूलाचा वापर करतात. सध्याच्या ऐन उन्हाळ्यात पूलावरून जाणाऱ्या प्रवास्यांना उन्हाचे चटके सहन करत रेल्वे स्थानक गाठावे लागत होते. रखरखत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. सदर पादचारी पूल पश्चिम रेल्वे प्रशासन आणि मुंबई रेल्वे विकास कॉपेर्रेशन या दोघांच्या कलगी तुऱ्यामुळे पदचारी पूल उघड्या अवस्थेत पडलेला होता.