अखेर मुंबईला मिळाले कायम शिक्षण उपसंचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:35 AM2020-12-17T04:35:02+5:302020-12-17T04:35:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विभागाला गेल्या साडेचार ते पाच वर्षांपासून पूर्णवेळ शिक्षण उपसंचालक देण्यात प्रशासनाला अपयश ...

Finally, Mumbai got a Deputy Director of Permanent Education | अखेर मुंबईला मिळाले कायम शिक्षण उपसंचालक

अखेर मुंबईला मिळाले कायम शिक्षण उपसंचालक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विभागाला गेल्या साडेचार ते पाच वर्षांपासून पूर्णवेळ शिक्षण उपसंचालक देण्यात प्रशासनाला अपयश येते होते. यामुळे हा कारभार प्रभारी पदांवर सुरू होता. शिक्षकांच्या नियुक्त्यांपासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मान्यतेपर्यंतची अनेक कामे खोळंबून राहिली होती. बुधवारी शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या गेल्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला कायमस्वरूपी उपसंचालक मिळाले आहेत.

शिक्षण उपसंचालक कार्यालयातून नवीन शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची मान्यता, संच मान्यता, शिक्षकांची वैयक्तिक मान्यता, अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अशी एक ना अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक कामे होतात. यामुळे शिक्षण उपसंचालक पद महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र अनेक वर्षांपासून शिक्षण विभागातील बदल्या थांबवलेल्या असल्याने बहुतेक पदांवर प्रभारींची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून असंतोष व्यक्त करण्यात येत होता. राज्यातील २७ उपसंचालकांची पदे रिक्त असून नऊ विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बहुतांश कार्यालयाची जबाबदारी ही अनेक वर्षे प्रभारी उपशिक्षण संचालकांच्या खांद्यावर होती. मात्र आता प्रभारीचा भार हलका करून कायम उपसंचालकांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली आहे.

शिक्षण उपसंचालकाचा पदभार अनेक वर्षे शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्याकडे होता. परंतु नुकतेच अहिरे यांच्याकडील पदभार काढून तो उत्तर मुंबई विभागाचे शिक्षक निरीक्षक अनिल साबळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तसेच औरंगाबद विभागीय निरीक्षकपद हेसुद्धा प्रभारींच्याच खांद्यावर होते. मात्र बुधवारी केलेल्या बदल्यांमध्ये प्रभारी जबाबदाऱ्या दूर करत मुंबई विभागीय उपसंचालकपद राज्य मंडळाचे मुंबई विभागाचे सचिव संदीप संगवे यांच्याकडे सोपवली. तर औरंगाबाद विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा कारभार अनिल साबळे, पुणे शिक्षण उपसंचालकपदी औदुंबर उकिरडे, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकपदी वैशाली जामदार, लातूर विभागीय शिक्षण उपसंचालकपदी गणपत मोरे यांची निवड करण्यात आली आहे

राज्य मंडळाच्या नाशिक विभागीय सचिवपदी राजेंद्र अहिरे, लातूर विभागीय सचिवपदी सुधाकर तेलंग, मुंबई विभागीय सचिवपदी सुभाष बोरसे, पुणे विभागीय सचिवपदी अर्चना कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या उपआयुक्तपदी हारुण आत्तार, शैलजा दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Finally, Mumbai got a Deputy Director of Permanent Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.