अखेर पालिकेला सापडला महाभरतीचा मुहूर्त , स्थायी समितीचा हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 07:36 AM2017-12-01T07:36:09+5:302017-12-01T07:36:16+5:30

मुंबई महापालिकेतील विविध विभागांमध्ये बराच काळ रिक्त असलेल्या जागा आता भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थींना जागा राखून ठेवण्यात येणार आहे.

 Finally, the municipal corporation founder, the Chief Commissioner of the Mahabharata, the green flag of the Standing Committee | अखेर पालिकेला सापडला महाभरतीचा मुहूर्त , स्थायी समितीचा हिरवा कंदील

अखेर पालिकेला सापडला महाभरतीचा मुहूर्त , स्थायी समितीचा हिरवा कंदील

Next

मुंबई : मुंबई महापालिकेतील विविध विभागांमध्ये बराच काळ रिक्त असलेल्या जागा आता भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थींना जागा राखून ठेवण्यात येणार आहे. तसेच न्यायालयात गेलेल्या ९०५ उमेदवारांनाही सामावून घेण्याचे संकेत प्रशासनाने दिल्यामुळे भरतीच्या प्रस्तावाला स्थायी
समितीने हिरवा कंदील दाखविला आहे.
यापूर्वी महापालिकेत झालेल्या भरती प्रक्रियेतील ९०५ उमेदवार न्यायालयात गेले आहेत. तरीही पालिकेने १३०० हून अधिक पदांची भरती जाहीर केली होती. मात्र यापूर्वी झालेल्या भरतीचा वाद सुरू असताना नवीन भरती कशी होते? हा वाद मिटवून मगच नवीन भरती करा,
अशी सूचना नगरसेवकांनी केली
होती. याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका मांडेपर्यंत स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत भरतीचा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता. यावर प्रशासनाने स्पष्टीकरण दिल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
त्यानुसार या प्रस्तावित भरतीमध्ये पालिका रुग्णालये, पाणी खाते, सफाई विभाग आणि प्रशासकीय विभागात ही भरती केली जाणार
आहे.
या सर्व सेवा अत्यावश्यक असल्यामुळे कर्मचारी भरती न झाल्यास नागरिकांना देण्यात येणाºया सुविधांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे ही भरती होणे आवश्यक असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावर यांनी सांगितले.

या विभागात राबविणार प्रक्रिया

भरतीमध्ये पालिका रुग्णालये, पाणी खाते, सफाई विभाग आणि प्रशासकीय विभागात ही भरती केली जाणार आहे.

च्उप जलअभियंता (परिरक्षण) विभाग २६०
च्उप जलअभियंता (प्रचालने) ३७
च्उप जलअभियंता (पिसे -पांजरापोळ) ३७
च्उप जलअभियंता (भांडुप संकुल) २६
च्उप जलअभियंता (मुंबई प्रकल्प ३ ए) १८
च्उप जलअभियंता (बांधकामे) ७६
च्पाणी विभाग २७८
च्मलनि:सारण व प्रचालने ४९६
च्रुग्णालये (केवळ पाच रुग्णालये) ८०
च्आरोग्य खाते (केवळ स्मशानभूमी) ६९

Web Title:  Finally, the municipal corporation founder, the Chief Commissioner of the Mahabharata, the green flag of the Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.