मुंबई : मुंबई महापालिकेतील विविध विभागांमध्ये बराच काळ रिक्त असलेल्या जागा आता भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थींना जागा राखून ठेवण्यात येणार आहे. तसेच न्यायालयात गेलेल्या ९०५ उमेदवारांनाही सामावून घेण्याचे संकेत प्रशासनाने दिल्यामुळे भरतीच्या प्रस्तावाला स्थायीसमितीने हिरवा कंदील दाखविला आहे.यापूर्वी महापालिकेत झालेल्या भरती प्रक्रियेतील ९०५ उमेदवार न्यायालयात गेले आहेत. तरीही पालिकेने १३०० हून अधिक पदांची भरती जाहीर केली होती. मात्र यापूर्वी झालेल्या भरतीचा वाद सुरू असताना नवीन भरती कशी होते? हा वाद मिटवून मगच नवीन भरती करा,अशी सूचना नगरसेवकांनी केलीहोती. याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका मांडेपर्यंत स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत भरतीचा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता. यावर प्रशासनाने स्पष्टीकरण दिल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.त्यानुसार या प्रस्तावित भरतीमध्ये पालिका रुग्णालये, पाणी खाते, सफाई विभाग आणि प्रशासकीय विभागात ही भरती केली जाणारआहे.या सर्व सेवा अत्यावश्यक असल्यामुळे कर्मचारी भरती न झाल्यास नागरिकांना देण्यात येणाºया सुविधांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे ही भरती होणे आवश्यक असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावर यांनी सांगितले.या विभागात राबविणार प्रक्रियाभरतीमध्ये पालिका रुग्णालये, पाणी खाते, सफाई विभाग आणि प्रशासकीय विभागात ही भरती केली जाणार आहे.च्उप जलअभियंता (परिरक्षण) विभाग २६०च्उप जलअभियंता (प्रचालने) ३७च्उप जलअभियंता (पिसे -पांजरापोळ) ३७च्उप जलअभियंता (भांडुप संकुल) २६च्उप जलअभियंता (मुंबई प्रकल्प ३ ए) १८च्उप जलअभियंता (बांधकामे) ७६च्पाणी विभाग २७८च्मलनि:सारण व प्रचालने ४९६च्रुग्णालये (केवळ पाच रुग्णालये) ८०च्आरोग्य खाते (केवळ स्मशानभूमी) ६९
अखेर पालिकेला सापडला महाभरतीचा मुहूर्त , स्थायी समितीचा हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 7:36 AM