Join us

...अखेर पावनधाम कोविड सेंटरला पालिकेकडून परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिका प्रशासन कांदिवली पश्चिम महावीरनगरच्या जवळ असलेल्या जैन मंदिरात उभारण्यात आलेल्या पावनधाम कोविड सेंटरला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पालिका प्रशासन कांदिवली पश्चिम महावीरनगरच्या जवळ असलेल्या जैन मंदिरात उभारण्यात आलेल्या पावनधाम कोविड सेंटरला पालिका परवानगी देत नसल्याच्या निषेधार्थ उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि त्यांच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आर. मध्य पालिका वॉर्ड कार्यालयाच्या पायऱ्यांवर बुधवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले.

अखेर पालिका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत २२ एप्रिलपासून पावनधाम कोविड सेंटरला रीतसर परवानगी देण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

काही दिवसांपूर्वी खासदार शेट्टी हे कोविडमधून बरे झाले आहेत.

त्यांनी सांगितले की, पालिका प्रशासनातर्फे भांडुप कोविड सेंटरच्या अग्निकांडात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत दिली पाहिजे, तसेच एका दुर्घटनेचे उदाहरण देऊन उत्तर मुंबई किंवा कुठल्याही कोविड सेंटरला पालिका प्रशासन परवानगी देत नाही हे चुकीचे आहे. महानगरपालिकेने स्वतः सर्व खर्च उचलून पावनधाम येथील कोविड सेंटर चालवावे अशी मागणी त्यांनी केली.

सुमारे ९०० हून अधिक रुग्ण येथून कोविडमुक्त झाले. मात्र, नंतर काही कारणातस्तव गेल्या सप्टेंबरमध्ये हे कोविड सेंटर बंद झाले.

५० बेडच्या या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधा, ६ डॉक्टर, २ सल्लागार डॉक्टर आणि ३० जणांचा कर्मचारी वर्ग आहे.

--------------