अखेर महापालिकेच्या संकेत स्थळावरून माजी महापौर, उपमहापौरांची छायाचित्रे काढली

By धीरज परब | Published: September 15, 2022 08:54 PM2022-09-15T20:54:42+5:302022-09-15T20:55:16+5:30

मीरा भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ २७ ऑगस्टलाच संपला

Finally, pictures of the former mayor and deputy mayor were taken from the website of the municipal corporation | अखेर महापालिकेच्या संकेत स्थळावरून माजी महापौर, उपमहापौरांची छायाचित्रे काढली

अखेर महापालिकेच्या संकेत स्थळावरून माजी महापौर, उपमहापौरांची छायाचित्रे काढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ २७ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर देखील महापालिकेच्या संकेत स्थळावर महापौर, उपमहापौर म्हणून छायाचित्र व नाव कायम असल्याच्या तक्रारी नंतर प्रशासनाने कार्यवाही करत त्यांची छायाचित्रे व नाव आदी काढून टाकले आहे. महापालिकेच्या संकेत स्थळावर महापौर, आयुक्त व उपमहापौर यांचे छायाचित्र, नाव दर्शनी भागात असते. पण नगरसेवकांची मुदतच २७ ऑगस्ट रोजी संपल्याने तत्कालीन महापौर ज्योत्सना हसनाळे व उपमहापौर हसमुख गेहलोत यांचे पद सुद्धा आपसूकच गेले आहे. पद नसताना देखील महापालिकेच्या संकेत स्थळावर मात्र महापौर म्हणून हसनाळे व उपमहापौर म्हणून गेहलोत यांचे नाव, छायाचित्र कायम होती. या प्रकरणी भाईंदरचे नागरिक दिनेश नाईक यांनी पालिकेकडे तक्रार केली.

पद नसताना देखील संकेत स्थळावर त्यांना पदाधिकारी म्हणून कायम ठेवणे गैर असल्याने त्यांची छायाचित्र , उल्लेख काढण्याची मागणी केली होती. त्या नंतर पालिका प्रशासनाचे सुद्धा डोळे उघडले व त्यांनी हसनाळे व गेहलोत यांच्या नावासह छायाचित्र आदी काढून टाकली आहेत. आता दर्शनी भागात आयुक्त व प्रशासक नात्याने केवळ दिलीप ढोले यांचा उल्लेख व छायाचित्र आहे.

Web Title: Finally, pictures of the former mayor and deputy mayor were taken from the website of the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.