अखेर द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालये

By admin | Published: December 26, 2016 06:52 AM2016-12-26T06:52:22+5:302016-12-26T06:52:22+5:30

पूर्व द्रुतगती महामार्ग व पश्चिम द्रुतगती महामार्गावर पुरेशी सार्वजनिक शौचालये नसल्याने, या महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना

Finally, public toilets on the highway | अखेर द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालये

अखेर द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालये

Next

मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्ग व पश्चिम द्रुतगती महामार्गावर पुरेशी सार्वजनिक शौचालये नसल्याने, या महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असे. ही बाब लक्षात घेत, मुंबई महापालिकेने पूर्व द्रुतगती महामार्गावर सात तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर सहा शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, आता पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ६ पैकी ५ शौचालये सुरू झाली आहेत, तर पूर्व द्रुतगती महामार्गावरील सातही शौचालयांच्या बांधकामांच्या कार्यवाहीने आता वेग घेतला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गांच्या जवळ महापालिकेद्वारे नव्याने बांधण्यात आलेल्या किंवा बांधण्यात येत असलेल्या या सशुल्क शौचालयांमध्ये स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. महत्त्वाचे म्हणजे, दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन या शौचालयांचे बांधकाम असेल. किमान १ किलोमीटर आधी या शौचालयांची माहिती देणारे फलक लावण्यात येत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना याची माहिती मिळू शकेल. शौचालये महामार्गांच्या दोन्ही बाजूंना असतील.(प्रतिनिधी)
पश्चिम द्रुतगती महामार्ग
दहिसरकडे जाणाऱ्या दिशेला सांताक्रुझ येथे आग्रीपाडा सर्व्हिस रोड
 मुंबईकडे येणाऱ्या दिशेला अंधेरी पूर्वेला गुंदवली परिरक्षण चौकी व एम. व्ही. मार्ग जंक्शनच्या जवळ
मुंबईकडे येणाऱ्या दिशेला आय. वाय. महाविद्यालय व धीरज अपार्टमेंटच्या जवळ अंधेरी पूर्वेला प्रस्तावित
दहिसरकडे जाणाऱ्या दिशेला अंधेरी पूर्वेला आग्रीपाडा र्सिर्व्हस रोड
दहिसरकडे जाणाऱ्या दिशेला गोरेगाव येथे आग्रीपाडा सर्व्हिस रोड व महामार्गादरम्यान
मुंबईकडे येणाऱ्या दिशेला कांदिवली येथे समतानगर पोलीस स्टेशनजवळ.

पूर्व द्रुतगती महामार्ग
मुलुंडकडे जाणाऱ्या दिशेला घाटकोपर परिसरातील ‘बेस्ट कॉलनी’ जवळ काम सुरू
 मुंबईकडे  येणाऱ्या दिशेला घाटकोपरजवळ काम सुरू
विक्रोळी उड्डाणपूल जिथे सुरू होतो, त्याच्या अलीकडील जंक्शनवर मुलुंडकडे जाणाऱ्या दिशेला विक्रोळी येथे काम सुरू
मुंबईकडे येणाऱ्या दिशेला विक्रोळी पोलीस स्टेशन बस स्टॉपजवळ काम सुरू
मुंबईकडे येणाऱ्या दिशेला भांडुप परिसरामधील भांडुपेश्वर कुंड मार्गाच्याजवळ काम सुरू
ऐरोली उड्डाणपुलाच्या खाली काम सुरू (याचा वापर दोन्ही दिशांनी जाणारे वाहनचालक करू शकतात.)
मुलुंडकडे जाणाऱ्या दिशेला मुलुंड टोलनाक्याजवळ असलेल्या महापालिका उद्यानाला लागून शौैचालय प्रस्तावित

Web Title: Finally, public toilets on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.