Join us

...अखेर रोहित्र बसवले

By admin | Published: March 15, 2015 10:32 PM

तालुक्यातील भडवळ गावातील पातळीचा माळ भागात सहा महिन्यांपासून वीज रोहित्र बंद होते, त्यामुळे शेजारच्या ममदापूर गावातून पातळीचा माळ

कर्जत : तालुक्यातील भडवळ गावातील पातळीचा माळ भागात सहा महिन्यांपासून वीज रोहित्र बंद होते, त्यामुळे शेजारच्या ममदापूर गावातून पातळीचा माळ भागात वीजपुरवठा केला जात असे. कमी दाबाने होत असलेल्या वीजपुरवठ्याविरोधात ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ग्रामस्थांच्या या पवित्र्यामुळे महावितरण प्रशासनाने पातळीचा माळ भागात नवीन रोहित्र बसवले आहे.सप्टेंबर महिन्यात भडवळ गावाच्या पातळीचा माळाच्या वस्तीचे विद्युत रोहित्र जळाले. त्यावेळी महावितरण कंपनीने पातळीच्या माळाला शेजारच्या ममदापूर गावातून वीजपुरवठा केला, मात्र त्याचा परिणाम दोन्ही गावांच्या वीजपुरवठ्यावर झाला. दोन्ही गावांत कमी दाबाने वीज मिळत होती. शेवटी ग्रामस्थांनी स्थानिक कार्यकर्ते किशोर घारे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीचे नेरळ येथील शाखा अभियंता शिर्के यांना घेराव घातला. विद्यार्थ्यांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे डोळ्यांचे आजार उद्भवल्याने ग्रामस्थ आक्र मक झाले होते. शेवटी कर्जत येथील उपअभियंता वाघमोडे यांनी स्थानिक ग्रामस्थांना नवीन वीज रोहित्र बसवून देण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली. याचा फटका दोन्ही गावच्या ग्रामस्थांना बसल्याने भडवळ माळ भागाला नवीन रोहित्र दिले.१०० केव्हीए क्षमतेचे वीज रोहित्र बसविल्याने ममदापूर गावावरचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. हे रोहित्र लावण्यासाठी गावातील तरुणांनी मदत केली. (वार्ताहर)