Join us

अखेर ५० हजार विद्यार्थ्यांना दिलासा, विद्यापीठाकडून निकाल जाहीर, २० हजारांहून अधिक विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 2:44 AM

मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालाला लेटमार्क लागला आहे. त्यातच ७० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल सप्टेंबर महिन्यातही जाहीर झाले नव्हते.

मुंबई : मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालाला लेटमार्क लागला आहे. त्यातच ७० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल सप्टेंबर महिन्यातही जाहीर झाले नव्हते. पण, आता गोंधळावर मात करत विद्यापीठाने तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.मुंबई विद्यापीठाने यापूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ७० हजार ४३० विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. त्यापैकी ५० हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अजूनही २० हजारांहून अधिक विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.उत्तरपत्रिकांचा शोध सुरूकाही दिवसांपासून आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळात उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची चर्चा सुरू होती. पण, असे काहीही झाले नसल्याचे मुंबई विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आता २ हजार ३०० उत्तरपत्रिका सापडत नसल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. पण, या उत्तरपत्रिका गहाळ नसून आॅनलाइन उत्तरपत्रिका प्रणालीत सरमिसळ झाली आाहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.हंगामी कर्मचाºयांच्या मागण्यामुंबई विद्यापीठाचा कारभार हा गेल्या काही वर्षांपासून जलद गतीने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, अनेक कर्मचारी हे हंगामी स्वरूपात काम करत आहेत. परीक्षा विभागातही मोठ्या प्रमाणात हंगामी कर्मचारी आहेत. त्यांच्यावर मोठ्या जबाबदाºया टाकण्यात आल्या आहेत. पण, त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे याप्रश्नी पुन्हा एकदा कामगार संघटनेतर्फे आक्रमक पवित्रा घेतला आहे. पगारापासून अन्य बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. यासंदर्भात प्रशासनाबरोबर वारंवार बैठका झाल्या आहेत. मात्र त्यानंतरही कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अखेर नव्या प्रभारी कुलगुरूंना आम्ही निवेदन देऊन भेटीची मागणी केल्याचे मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेच्या सुप्रिया करंडे यांनी सांगितले.तांत्रिक अडचणींमुळे कला शाखेच्या उत्तरपत्रिका वाणिज्य शाखेत अशा प्रकारे अन्य शाखांच्या उत्तरपत्रिका अन्य शाखांमध्ये गेल्या आहेत. या उत्तरपत्रिकांचा शोध सुरू आहे. पण, या उत्तरपत्रिकांचाही लवकरच शोध लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लवकरच जाहीर होतील, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ