अखेर पनवेल महानगरपालिकेला मंजुरी
By Admin | Published: September 27, 2016 12:25 PM2016-09-27T12:25:13+5:302016-09-27T12:26:17+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल महानगरपालिका स्थापना संदर्भात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून अखेर पनवेल महानगरपालिकेला मंजुरी मिळाली आहे.
>ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. २७ - गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल महानगरपालिका स्थापना संदर्भात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून अखेर पनवेल महानगरपालिकेला मंजुरी मिळाली आहे. मंगळवारी रात्री पनवेल महानगरपालिकेची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून येत्या १ ऑक्टोबरपासून नगर परिषदेवर प्रशासन लागू होणार आहे.
महानगर पालिका स्थापन होत असताना खारघरमधील काही संघटना, राजकीय पक्ष यांनी नियोजित पनवेल महानगर पालिकेत समाविष्ट होण्यास प्रखर विरोध दर्शविला होता. त्यामुळे खारघर शहर महानगरपालिकेतून वगळण्यात येईल अशाप्रकारच्या उलटसुलट चर्चा सुरु होती. मात्र महानगरपालिकेत खारघर चा सुद्धा समावेश करण्यात आला असून २९ महसुली गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.