Join us

रिक्षाचालकांच्या संपावर अखेर तोडगा; मालाडमध्ये स्टॅण्डचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 5:03 AM

मालाड पूर्वेकडील स्थानकाशेजारी असलेला रिक्षा स्टॅण्ड मंगळवारी बंद करण्यात आला. कोणत्याही प्रकारची सूचना न देता, तसेच पर्यायी रिक्षा स्टॅण्ड उपलब्ध करून न देता तत्काळ स्टॅण्ड बंद केल्यामुळे रिक्षाचालकांनी बुधवारी संप पुकारला होता.

मुंबई : मालाड पूर्वेकडील स्थानकाशेजारी असलेला रिक्षा स्टॅण्ड मंगळवारी बंद करण्यात आला. कोणत्याही प्रकारची सूचना न देता, तसेच पर्यायी रिक्षा स्टॅण्ड उपलब्ध करून न देता तत्काळ स्टॅण्ड बंद केल्यामुळे रिक्षाचालकांनी बुधवारी संप पुकारला होता. यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी सायंकाळी दिंडोशी पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत समस्येवर तोडगा निघाला. परिणामी, रिक्षाचालकांनी संप मागे घेत रिक्षा वाहतूक सुरू केली.येथील पाच अधिकृत रिक्षा स्टॅण्डवर रिक्षाचालकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुष्पा पार्क येथील रिक्षाचालकांना रेल्वे स्थानकाजवळील स्टॅण्डवर रिक्षा उभ्या करण्याची परवानगी बैठकीत नाकारण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेस रिक्षा टॅक्सी युनियनचे रिक्षाचालक विनोद जगताप यांनी दिली.दिवसेंदिवस जशी प्रवाशांची संख्या वाढली तशीच रिक्षांचीही. परिणामी, जागेची कमतरता भासू लागल्याने प्रवाशांना स्थानकाकडे ये-जा करण्यासाठी त्रास होऊ लागला. तसेच आजूबाजूच्या दुकानदारांना त्रास होऊ लागला. लोकप्रतिनिधींकडे याबाबत तक्रारी वाढल्याने हा स्टॅण्ड बंद करण्यात आला होता.राणी सती मार्गावर रेल्वेच्या पादचारी पुलाचे काम सुरू असून येथील वाहतुकीचा ताण दफ्तरी रोडवर पडतो. परिणामी, स्थानकाजवळील रिक्षा स्टॅण्डजवळ सकाळी-सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. ज्या रिक्षाचालकांकडे परवाना आहे त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेविका दक्षा पटेलयांनी दिली.संपामुळे नागरिकांना त्रासआप्पापाडा, त्रिवेणी नगर, शिवाजी नगर, संतोषी नगर आणि आनंदवाडी नाका येथील रिक्षाचालकांनी संप पुकारल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. परिणामी, बसमध्ये गर्दी पाहायला मिळाली.

टॅग्स :मुंबई