Join us

Breaking : अखेर महाराष्ट्रात 'तानाजी' टॅक्स फ्री, लवकरच अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:44 PM

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करुन तानाजी चित्रपटाबद्दल महाविकास आघाडीची भूमिका

मुंबई - अभिनेता अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा महाराष्ट्रात करमुक्तकरा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तानाजी चित्रपटाला महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावे, असे म्हटले आहे. आता, तानाजी चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार असल्याच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केलं आहे. 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करुन तानाजी चित्रपटाबद्दल महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली. ''तान्हाजी चित्रपट करमुक्त कारण्यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. करमणूक करही आता जीएसटीच्या अखत्यारीत येत असल्याने राज्य सरकार SGST चा परतावा देणार आहे, मुख्यमंत्री लवकरच तशी घोषणा करतील.'' असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात मला पत्र लिहून महाराष्ट्रातील चित्रपट रसिक आणि शिवप्रेमींची #TanhajiTheUnsungWarrior चित्रपट करमुक्त करावा ही भूमिका आग्रहाने मांडली होती, असेही थोरात यांनी सांगितले आहे.   छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठीजनांपर्यंत हा चित्रपट पोहोचणे आणि या ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच, त्यांच्या शौर्याचे स्मरण होण्यासाठी तानाजी हा चित्रपट राज्यात करमुक्त करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर, बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करुन आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील सहमतीची माहिती दिली. 

अजय देवगणचा तानाजी आणि दीपिका पादुकोणचा 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यांत तानाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला मागे टाकले आहे. तानाजी चित्रपटाने 2020  मधील 100 कोटींचा टप्पा गाठणारा पहिला चित्रपट म्हणून मान मिळणार आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यात तानाजी चित्रपट करमुक्त केला होता. त्यानंतर, आता हरियाणातील भाजपा सरकारनेही तानाजी चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :मुंबईउद्धव ठाकरेतानाजीबाळासाहेब थोरात