Join us

आनंदवार्ता! ५८५ गिरणी कामगारांची अखेर स्वप्नपूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:03 AM

म्हाडातर्फे गिरणी कामगारांसाठी कोन (पनवेल) येथील २४१७ घरांच्या विक्रीकरिता २०१६ मध्ये लॉटरी काढण्यात आली होती.

मुंबई :म्हाडातर्फे गिरणी कामगारांसाठी कोन (पनवेल) येथील २४१७ घरांच्या विक्रीकरिता २०१६ मध्ये लॉटरी काढण्यात आली होती. त्यातील यशस्वी ठरलेल्या पात्र व घरांच्या संपूर्ण विक्री किमतीचा भरणा केलेल्या ५८५ गिरणी कामगार/वारसांना पहिल्या टप्प्यांतर्गत घरांची चावी वांद्रे पूर्व येथील समाजमंदिर हॉलमध्ये देण्यात आली.६ महिन्यांमध्ये सोडतीत सुमारे १८०० पात्र गिरणी कामगार/वारस यांना हक्काच्या घराचा ताबा दिला आहे. कोन येथे एमएमआरडीएतर्फे बांधलेल्या १६० चौरस फुटांच्या दोन घरांना एकत्र करून ३२० चौरस फूट चटई क्षेत्रफळ आकारमानाची घरे गिरणी कामगार / वारस यांना मिळणार आहे. घरांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाने पुढाकार घेऊन काम पूर्ण केले आहे. 

मुंबईच्या सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या गिरणी कामगारांच्या योगदानाचा सन्मान करत राज्य शासनाने त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला आहे.- आ. सुनील राणे, अध्यक्ष, गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती

गिरणी कामगार / वारस यांना मोठ्या अथक परिश्रमानंतर हक्काचे घर मिळाले आहे. हे घर म्हणजे लक्ष्मी असून, भावीपिढीला त्याचा लाभ घेता यावा, यासाठी हक्काचा निवारा सांभाळून ठेवा. कुठल्याही परिस्थितीत त्याची विक्री करू नका.- कालिदास कोळंबकर, आमदार

टॅग्स :मुंबईम्हाडा