अखेर पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांचे घराचे स्वप्न होणार साकार

By मनोहर कुंभेजकर | Published: June 12, 2023 12:07 PM2023-06-12T12:07:25+5:302023-06-12T12:07:59+5:30

या रहिवाशांना आता झो.पु.प्रा.योजनेद्वारे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर मिळणार आहे.

finally the dream of the first floor hut dwellers will come true | अखेर पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांचे घराचे स्वप्न होणार साकार

अखेर पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांचे घराचे स्वप्न होणार साकार

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दिंडोशी विधानसभा मतदार संघातील मालाड (पूर्व) जानू भोये नगर येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. या रहिवाशांना आता झो.पु.प्रा.योजनेद्वारे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर मिळणार आहे. जानू भोये नगरमधील रहिवाशांनी घरासाठी तब्बल १२ वर्षे लढा दिला होता. 

मालाड हायवे, मंत्रालय येथे धरणे आंदोलन केले अखेर रहिवाशांच्या लढ्याला यश मिळाला. काल दि,११ जून रोजी रहिवाशांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. जानू भोये नगरमध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना घर देण्यासाठी माजी नगरसेवक आणि भाजप नेते  विनोद मिश्रा यांनी अथक प्रयत्न केले.तर उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी गेली अनेक वर्षे यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.तर लोकमतने सातत्याने हा विषय मांडला होता. मिश्रा यांनी लोकमतला या शुभ वर्तमानाची माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने ६ सप्टेंबर २०१९ रोजी पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना घर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. तेव्हा मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस होते. पण काही कारणामुळे सरकार बदललं आणि नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मध्ये  देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.  तसेच गृहनिर्माण खाते त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी पुन्हा या विषयावार माहिती घेतली आणि म्हाडाच्या मुख्य कार्यालयात दिनांक २८ सप्टेंबर  २०२२ रोजी बैठक आयोजीत केली होती. या बैठकित सविस्तर चर्चा आणि सादरीकरण देखील झाले होते.त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टी क्षेत्रात असणाऱ्या जुन्या चाळातील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूंबाबत सहानभूतीपूर्वक तसेच सकारात्मक निर्णय  घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते. 

या बैठकिनंतर हा प्रस्ताव मंत्रालयातच पडून होता. त्यासंदर्भात माहिती घेवून  मिश्रा यांनी  फडणवीस यांची भेट घेतली. शनिवारी दि,१० जून रोजी उपमुख्यमंत्र्यां सोबत फडणवीस यांच्यासोबत त्यांनी भेट झाली आणि याविषयावर चर्चा केली. तसेच यासंदर्भात सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन  फडणवीस यांनी दिले. 

काल दि,११ जून  रोजी जानू भोये नगर  येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना झो.पु.प्रा.योजनेद्वारे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर मिळणार असल्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाल्याचे कळविण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या त्वरीत निर्णयामुळे जानू भोये नगर येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे त्याचबरोबर या निर्णयाचा फायदा मुंबईमधील अनेक झोपडीधारकांना भविष्यात नक्कीच होणार आहे, असा विश्वास  विनोद मिश्रा यांनी व्यक्त केला. या संपूर्ण प्रक्रियेत खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मिहीर कोटेचा यांनी मोलाची मदत केली याबद्दल त्यांचे ही आभार मानले.

Web Title: finally the dream of the first floor hut dwellers will come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.