अखेर पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना टॅब मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 07:04 AM2018-01-05T07:04:39+5:302018-01-05T07:04:55+5:30
टॅब खरेदीसाठी ठेकेदारच पुढे येत नसल्याने अट शिथिल करणाºया महापालिकेच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते अडीच हजार रुपये जादा मोजूनही टॅबचा पुरवठा होण्यास आणखी काही काळ लागणार आहे.
मुंबई - टॅब खरेदीसाठी ठेकेदारच पुढे येत नसल्याने अट शिथिल करणाºया महापालिकेच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते अडीच हजार रुपये जादा मोजूनही टॅबचा पुरवठा होण्यास आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे पालिका शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना या टॅबचा लाभ मिळणार नाही, असे दिसून येत आहे.
पालिकेचे शिक्षण हायटेक करण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरूमनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टॅबची संकल्पना २०१४ मध्ये आणली. त्यानुसार इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासह टॅब पुढील तीन वर्षे वापरण्यास देण्यात येत होता. मात्र नववीचा पाठ्यक्रम बदलल्यामुळे नव्याने टॅब खरेदी करण्यात येत आहे. नववीचा नवीन पाठ्यक्रम टाकून हा टॅब मिळेपर्यंत यंदाचे शैक्षणिक वर्ष संपुष्टात येणार असल्याने या वर्षीच्या मुलांना या सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे.
पालिकेने निविदेची अट शिथिल केल्यानंतर दोन कंपन्या पुढे आल्या. यात मे. कार्वी मनेजमेंट सर्व्हिस
या कंपनीला टॅब पुरवठ्याचे कंत्राट मिळणार आहे. असे १८ हजार ७८
टॅब विमा व वॉरंटीसह खरेदी करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी साडेसात हजार रुपयांनी खरेदी केलेल्या टॅबसाठी महापालिका यंदा प्रत्येकी
१० हजार ३१९ रुपये मोजणार
आहे. यासाठी एकूण १८ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात
आली आहे.
पालिका शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येतो.२०१४ पासून ही योजना सुरू करण्यात आली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलल्याने १८ हजार ७८ हजार टॅब महापालिकेला खरेदी करावे लागणार आहेत.