अखेर ‘त्या’ रिक्षाचालकांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा

By admin | Published: June 16, 2017 01:32 AM2017-06-16T01:32:41+5:302017-06-16T01:32:41+5:30

धावत्या रिक्षात युवतीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रिक्षाचालकांना अटक केल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात प्राणघातक हल्ल्याचे

Finally, those 'rickshaw drivers' were fatal crimes | अखेर ‘त्या’ रिक्षाचालकांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा

अखेर ‘त्या’ रिक्षाचालकांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : धावत्या रिक्षात युवतीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रिक्षाचालकांना अटक केल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात प्राणघातक हल्ल्याचे कलम गुरुवारी वाढवले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
७ जून रोजी रात्री ९.४० वाजताच्या सुमारास तीनहातनाका येथून घरी जाण्यासाठी रिक्षामध्ये बसलेल्या एका तरुणीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, या रिक्षामध्ये चालकाच्या गणवेशात मागे बसलेल्या एका सहप्रवाशाने केला होता. नौपाडा पोलिसांनी या प्रकरणी लुईसवाडीतील संतोष नामदेव लोखंडे आणि वागळे इस्टेटमधील ज्ञानेश्वरनगरातील लहू घोगरे यांना बुधवारी अटक केली. घटनेच्या वेळी लहू घोगरे रिक्षा चालवत होता, तर संतोष लोखंडेने पीडित युवतीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. नौपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३६३ (अपहरण), ३५४ (विनयभंग), ३२५ (गंभीर दुखापत) आणि ५०६ (२) (जिवे मारण्याची धमकी) अन्वये ७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी या गुन्ह्यात भादंविचे कलम ३०७ (प्राणघातक हल्ला) वाढवण्यात आले. आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पीडित युवतीने तीव्र प्रतिकार केला. त्या वेळी आरोपीने तिला रिक्षातून ढकलले होते. आरोपीच्या या कृत्यामुळेच त्याच्यावर दाखल गुन्ह्याच्या कलमात ३०७ हे कलम वाढवण्यात आले.

Web Title: Finally, those 'rickshaw drivers' were fatal crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.