Join us

अखेर विवेक पंडित यांची जामिनावर सुटका

By admin | Published: May 04, 2017 4:54 AM

विवेक पंडित यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची जामिनावर सुटका

पालघर : जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर श्रमजीवी संघटनेने केलेल्या आंदोलनानंतर संघटनेचे विवेक पंडित यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणी त्यांनी श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. बुधवारी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर पंडित यांनी थेट ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी आंदोलकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या विधानांकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी विवेक पंडित यांच्यासह बाळाराम भोईर, विजय जाधव, सुरेश रेंजड, अशोक सापटे, प्रमोद पवार, सरिता जाधव, सीता घाटाळ, स्नेहा घरत, ममता परेड हे उपस्थित होते.त्यानंतर विवेक पंडित व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि इतर संबंधित विभागांचे सचिव आणि अधिकाऱ्यांची मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. पालघर जिल्ह्यातील कुपोषण, आरोग्याशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शासनाच्या अनेक योजना, उपक्रम गावपातळीवर राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कामाचा मोबदला योग्य व वेळेवर न मिळणे, त्यांना अल्प मानधनावर कंत्राटी पद्धतीने राबविणे याबाबत मोर्चे काढून व निवेदने देऊनही प्रश्न सुटत नाहीत, अशा अनेक प्रश्नाांकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले व या समस्या सोडवण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)कुपोषणासह विविध विषयांवर चर्चापोषण आहाराची रक्कम ग्राहक मूल्य निर्देशकांशी जोडून व आगाऊ द्यावी , कुपोषण, भूकबळी निर्मूलन आणि रेशनिंगच्या धोरणात्मक सुधारणांबाबत या वेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली.