क्यार' व 'महा' चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना १५.८० कोटींचा निधी वितरीत करण्यास वित्त विभागाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 07:57 PM2021-09-08T19:57:10+5:302021-09-08T19:57:17+5:30
मच्छीमारांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाला आहे.
मुंबई: 'क्यार' व 'महा' चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना १५.८० कोटींच्या निधी वितरणास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. राज्याचे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरखात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती दिली. वित्त विभागाने आता या एकूण पॅकेजपैकी १५.८० कोटी निधीच्या वितरणास मान्यता दिली असून यामुळे चक्रीवादळ व निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तींनी त्रस्त मच्छीमारांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाला आहे.
'क्यार' व 'महा' चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना व ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१९ मध्ये वादळी हवामानामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलेल्या मच्छीमारांसाठी सप्टेंबर २०२० मध्ये ६५.१७ कोटींचं विशेष आर्थिक पॅकेज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं. पण 'कोरोना' आपत्तीच्या काळात ५०% निधीच वित्त विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे वितरीत करण्यात आला होता. उर्वरीत निधी तातडीने मत्स्यव्यवसाय विभागाकडे वितरीत करण्याची मागणी मंत्री अस्लम शेख यांनी लावून धरली होती.