कर्जमाफीसाठी वित्त विभागाने दिले 20 हजार कोटी, 14 हजार कोटी सहकार विभागाकडे वळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:54 AM2017-10-25T05:54:14+5:302017-10-25T05:54:18+5:30
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतक-यांना देण्यात येणा-या कर्जमाफीसाठी वित्त विभागाने वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतक-यांना देण्यात येणा-या कर्जमाफीसाठी वित्त विभागाने वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यापैकी चौदा हजार कोटी सहकार विभागाकडे वळते करण्यात आले आहेत, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कर्जमाफीवरून वित्त विभागाने निधी दिला नाही, अशा बातम्या येत असताना वस्तुस्थिती तशी नसल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, वीस हजार कोटींंशिवाय जितके पैसे लागतील ते सगळे दिले जातील. कर्जमाफीच्या निकषात बसणाºया शेतकºयांची यादी बँकांकडे सहकार विभागाकडून दिली जाईल. सहकार विभाग यादीसोबत संबंधित बँकांना कर्जमाफीच्या रकमेचे धनादेशही देईल. बँका संबंधित शेतकºयाच्या कर्ज खात्यात पैसे जमा करतील आणि त्या शेतकºयाला कर्जमाफी झाल्याचा एसएमएस मिळेल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. एसएसएम आल्यानंतर संबंधित शेतकरी बँकेतील आपल्या खात्याच्या तपशिलाची खातरजमा करू शकेल.