मागास प्रवर्गातील कारागिरांना अर्थसाहाय्य
By admin | Published: January 4, 2015 11:12 PM2015-01-04T23:12:57+5:302015-01-04T23:12:57+5:30
इतर मागासवर्गीय महामंडळाच्या योजनेंतर्गत कलाकुसरीच्या व हस्तकला प्रकारात काम करणा-या कारागिरांच्या सर्वांगीण विकासाकरिता अर्थसाहाय्यासह प्रशिक्षण
Next
ठाणे : इतर मागासवर्गीय महामंडळाच्या योजनेंतर्गत कलाकुसरीच्या व हस्तकला प्रकारात काम करणा-या कारागिरांच्या
सर्वांगीण विकासाकरिता अर्थसाहाय्यासह प्रशिक्षण व बाजारपेठेचे नियोजन राष्ट्रीय व राज्य महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. कलाकुसरीच्या पारंपरिक वस्तू तयार करणारे कारागीर, विणकर व इतर व्यक्ती तथा समूहांनी या योजनेचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या संबंधीच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ठाणे पश्चिमेच्या कोपरी येथील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)