Join us

आर्थिक राजधानीत गेल्या वर्षभरात ३३ जणीचा हुंड्यासाठी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:06 AM

२० जणींची आत्महत्या, एकीची हत्याआर्थिक राजधानीत गेल्या वर्षभरात ३३ जणींचा हुंड्यासाठी बळीएकीची हत्या : २० जणींची आत्महत्या...

२० जणींची आत्महत्या, एकीची हत्या

आर्थिक राजधानीत गेल्या वर्षभरात ३३ जणींचा हुंड्यासाठी बळी

एकीची हत्या : २० जणींची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या वर्षभरात मुंबईत रस्त्यावरील गुन्हेगारीप्रकरणी १६ हजार १९० गुन्ह्यांची नोंद झाली. धक्कादायक बाब म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीत हुंड्यासाठी ३३ जणींना जीव गमवावा लागला. यात एकीची हत्या, तर २० जणींनी सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपविले.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मुंबईत ५१ हजार ६८ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद झाली. यापैकी ४० हजार ३९० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०१९ मध्ये हाच आकडा ४१ हजार ९३१ होता.

यात हत्या (१४८), हत्येचा प्रयत्न (३४८), दरोडा (१५), सोनसाखळी चोरी (७५२), खंडणी (२०४), घरफोडी (१,६४५), चोरी (३,४३३), वाहन चोरी (२,८०१), दुखापत (३,८०८), दंगल (३२४), बलात्कार ( ७६७), विनयभंग (१,९४५), तर अन्य गुन्हे (३४,८७८) असा समावेश आहे.

लॉकडाऊनच्या काळात रोडावलेली गुन्हेगारी अनलॉकच्या काळात पुन्हा ‘जैसे थे’ स्वरूपात आली. यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही डोके वर काढताना दिसून आल्या. यात महिला संबंधित ४ हजार ५३९ गुह्यांची नोंद झाली असून, ३ हजार ५०७ गुह्यांची उकल करण्यात आली आहे. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी ४५४ गुन्हे नोंद झाले असून, त्यापैकी २२० प्रकरणांची उकल करण्यात आली. २०१९ मध्ये ६०३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यात एका विवाहितेची हुंड्यासाठी हत्या करण्यात आली, तर १२ जणींना जीव गमवावा लागला. याप्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरवत १० प्रकरणांत कारवाई करण्यात आली. नेहमीच्या जाचाला कंटाळून २० जणींनी स्वतःचे आयुष्य संपविले. यात नवविवाहितांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य कारणांसाठी १८ जणींची हत्या करण्यात आली आहे, तर १९ जणींनी आत्महत्या केली आहे.

* ७७३ अल्पवयीन मुलींचे अपहरण

गेल्या वर्षभरात मुंबईतून ७७३ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली. यापैकी ६७३ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. गेल्यावर्षी हाच आकडा १ हजार ३३४ होता, तर ७६६ मुली, महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. यात ४४५ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

.....