धार्मिक स्थळांवरील प्रार्थना बंद केल्याने रमजान असतानाही मौलाना-हाफिजीसमोर आर्थिक संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:51 AM2020-04-27T01:51:13+5:302020-04-27T01:51:30+5:30

रमजान महिना सुरू झाल्याने रात्री इशाच्या नमाजनंतर अदा करण्यात येणारी तरावीह नमाजदेखील नागरिकांना घरी अदा करावी लागत आहे.

Financial crisis in front of Maulana-Hafiz even during Ramadan due to closure of prayers at religious places | धार्मिक स्थळांवरील प्रार्थना बंद केल्याने रमजान असतानाही मौलाना-हाफिजीसमोर आर्थिक संकट

धार्मिक स्थळांवरील प्रार्थना बंद केल्याने रमजान असतानाही मौलाना-हाफिजीसमोर आर्थिक संकट

Next

खलील गिरकर 
मुंबई : मुस्लीम बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा रमजान महिना शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शनानंतर सुरू झाला. शनिवारी देशभरात पहिला रोजा पाळण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्व धार्मिक स्थळांवरील प्रार्थना बंद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे मशिदीमधील सामूहिकपणे अदा करण्यात येणाऱ्या नमाजवरदेखील प्रतिबंध लादण्यात आले आहेत. मुस्लीम बांधवांनी सर्व नमाज घरी व्यक्तिगतरीत्या अदा करावी, मशिदीमध्ये येऊन सामूहिकपणे नमाज अदा करण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे. रमजान महिना सुरू झाल्याने रात्री इशाच्या नमाजनंतर अदा करण्यात येणारी तरावीह नमाजदेखील नागरिकांना घरी अदा करावी लागत आहे. त्यामुळे तरावीह नमाज अदा करण्यासाठी आवश्यक असणाºया हाफिज असणाऱ्यांची मागणी यंदा ठप्प झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
इस्लामी धर्मग्रंथ कुराण तोंडपाठ असणाºया मौलवींना कुराण हाफिज असे संबोधले जाते. रमजान महिन्यात अदा करण्यात येणाºया तरावीह या विशेष नमाजसाठी मुस्लीम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी कुराण मुखोद्गत असलेले हे हाफिज आवश्यक असतात. एखाद्या वेळी संदर्भ चुकू नये यासाठी एका वेळी किमान दोन हाफिज नमाज अदा करताना मशिदीमध्ये असतात. इस्लामी कॅलेंडरनुसार रमजान हा अत्यंत पवित्र व इतर महिन्यांच्या तुलनेत अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यात देशभरातील गावाखेड्यातील मशिदींमध्येदेखील या हाफिजींना अत्यंत मोठी मागणी असते. मात्र यंदा रमजान महिना सुरू झालेला असताना कोरोनावर विजय मिळवण्यासाठी लॉकडाउन सुरू असल्याने मशिदींमधील सामूहिक नमाज पूर्णत: बंद झाली आहे. केवळ मशिदीमधील अझान देणारी व्यक्ती व कमाल तीन व्यक्ती मशिदीत नमाज अदा करत आहेत. त्यामुळे ज्यावेळी या हाफिजना सर्वात जास्त मागणी असते नेमके त्याच वेळी त्यांना अजिबात मागणी नसल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. रमजान महिन्यात तरावीहसाठी नेमलेल्या हाफिजना रमजान ईदच्या दिवशी मशिदीच्या व्यवस्थापनाकडून मानधन व इतर नागरिकांकडून ईदी दिली जाते. मात्र यंदा तरावीहची नमाज घरातच व्यक्तिगतरीत्या अदा केली जात असल्याने त्यांच्यासमोर सामूहिक नमाज अदा करण्यास न मिळाल्याने मानसिक असमाधानासोबत रोजगाराचे संकटदेखील उभे ठाकले आहे.
गरीब नवाज मदरसाचे मौलाना अल्ताफ, मौलाना अब्दुल रहीम, जमैतुल उलेमा ए हिंदचे हाफिज अय्युब खान यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हाफिजींना मागणी असते. मात्र यंदा मशिदीच्या विश्वस्तांकडून बोलावणे आले नाही. या संकटसमयी समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींना मदत केली जात आहे. हाफिज असलेल्या व्यक्तींकडून वर्षभर धार्मिक कार्य केले जाते, याची दखल घेऊन त्यांना पुरेसे रेशन, महिन्याचे वेतन देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मदरसा मोईनिया अश्रफियाचे प्रमुख मौलाना मोईनुद्दीन अश्रफ म्हणाले, या हाफिजींची काळजी घेणे समाजातील सर्वांचे कर्तव्य आहे. रमजान महिन्यात त्यांना दुप्पट वेतन दिले जाते. यंदा दुप्पट वेतन दिले नाही तरी किमान नियमित वेतन मिळेल याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
रझा अकादमीतर्फे, जमैतुल उलेमातर्फे विविध मशिदींतील मौलाना व त्यांच्या कुटुंबीयांना रेशन किटवाटप करण्यात आले. मात्र समाजातील सर्वसामान्य नागरिकांकडूनदेखील त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे यावा, असे आवाहन केले जात आहे.

Web Title: Financial crisis in front of Maulana-Hafiz even during Ramadan due to closure of prayers at religious places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.