Join us

स्थलांतरित मतदारांचा शोध; जुन्या रहिवाशांशी संपर्क साधण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 8:18 AM

संतोष आंधळेलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही वर्षांपासून शहरात जुन्या इमारतीचा पुनर्विकास सुरू आहे. त्यामुळे अनेकजण उपनगरांत ...

संतोष आंधळेलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही वर्षांपासून शहरात जुन्या इमारतीचा पुनर्विकास सुरू आहे. त्यामुळे अनेकजण उपनगरांत वास्तव्यास गेले आहेत. काहीजण कौटुंबिक कारणांमुळे अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. परंतु मतदार ओळखपत्रावरील त्यांचा पत्ता जुनाच आहे. अशा  मतदारांचा शोध घेण्याचे काम  प्रत्येक मतदारसंघात सुरू आहे. यासाठी राजकीय पक्षांनी विशेष कार्यकर्त्यांची फौज कामाला लावली आहे. त्यांना संपर्क करण्याचे काम सुरू झाले आहे. 

सद्यःस्थितीत मतदार यादीचा अभ्यास करण्याचे काम उमेदवार पातळीवर सुरू आहे. विश्वासू कार्यकर्त्यांची टीम उमेदवाराने त्यासाठी कामाला लावली आहे. त्यात प्रत्येक राजकीय पक्ष गेल्या लोकसभा निवडणुकीत बुथनिहाय कुठून कुणाला किती आघाडी मिळाली आहे, तसेच सध्या तिथे आघाडी मिळविण्यासाठी काय करावे लागेल, याची आखणी केली जात आहे. परिसरातील अनेकजण मतदार यादीत नाव असले तरी काही कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणामुळे बाहेर कुठे राहण्यास गेले आहेत. त्यांची रीतसर यादी बनविण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच त्यांना संपर्क कधी करायचा, याचे नियोजन आखले जात आहे.

आमचे घर लालबागला असले तरी मुंबई सेंट्रल येथील जुने घर आहे. त्यामुळे तिथे जाऊनच आम्ही मतदान करणार आहोत. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाने संपर्क साधला नाही तरी आम्ही आमचे कर्तव्य बजावणार आहोत.       - रोहित उगले, लालबाग

मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते पार पाडण्यासाठी गेली अनेक वर्षे मी माझ्या ताडदेव येथील माझ्या घराशेजारील मतदान केंद्रावर येत असतो. मी सध्या तिथे राहात नसलो तरी मतदानाला नक्की येतो.    -किरण काकड, कांदिवली

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४