Join us

‘गुगल’वर फोन नंबर शोधणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 4:58 AM

डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा परिसरात राहणारा नारायण मोता यांना आपल्या वाहनाचे आरसी बुक मिळाले नव्हते.

कल्याण : कल्याण आरटीओचा फोन नंबर गुगल सर्च इंजीनवर शोधणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. दोन बँक खात्यातून आॅनलाइनद्वारे ९६ हजार ६०० रुपये काढून घेत एका भामट्याने त्यांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.

डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा परिसरात राहणारा नारायण मोता यांना आपल्या वाहनाचे आरसी बुक मिळाले नव्हते. त्याबाबत विचारपूस करण्यासाठी नारायण यांनी २९ आॅक्टोबरला ‘गुगल सर्च’वर कल्याण आरटीओचा फोन नंबर शोधला. तिथे दिलेल्या एका मोबाइल नंबरवर संपर्क साधत आरसी बुकबाबत विचारपूस केली. मोबाइलवर बोलणाऱ्याने नारायण यांना एक लिंक पाठविली. त्यावर नारायण यांनी यूपीआय आयडी, पासवर्ड भरला. लगेचच त्यांच्या एका खात्यातून ४७ हजार ६०० रुपये तसेच, अन्य एका खात्यातून ४९ हजार रुपये, असे ९६ हजार ६०० रुपये परस्पर काढले. नारायण यांनी विष्णूनगर पोलीसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :गुगलमोबाइल