फाइन आर्टिस्टला हवा मदतीचा हात, मुलाने काढले घराबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 04:20 AM2018-05-10T04:20:59+5:302018-05-10T04:20:59+5:30
मुलाने घराबाहेर काढलेल्या वर्सोवा, सात बंगला येथील शंकर वाघमारे (७२) यांना मदतीचा हात हवा आहे. २०१० साली त्यांचा मुलगा विकास उर्फ बॉबी (४५) याने आपल्या जन्मदात्या वडिलांना घराबाहेर काढले होते. याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाणे ठाणे येथे तक्र ारही नोंदविण्यात आली आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुलाने घराबाहेर काढलेल्या वर्सोवा, सात बंगला येथील शंकर वाघमारे (७२) यांना मदतीचा हात हवा आहे. २०१० साली त्यांचा मुलगा विकास उर्फ बॉबी (४५) याने आपल्या जन्मदात्या वडिलांना घराबाहेर काढले होते. याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाणे ठाणे येथे तक्र ारही नोंदविण्यात आली आहे. त्यांच्या हृदयस्पर्शी कहाणीला सर्वप्रथम लोकमतने वाचा फोडल्यावर त्याचे राज्यात जोरदार पडसाद उमटले. सोशल मीडियावरून ‘लोकमत’ची बातमी जोरदार गाजली. शंकर वाघमारे यांना शेकडो फोन आले, आणि काहींनी त्यांना मदतीचा हात पुढे केला. तर ‘लोकमत’च्या बातमीची दखल घेऊन काही वृत्त वाहिनीने त्यांच्या या हृदयस्पर्शी कहाणीला वाचा फोडली.
मुलाने घराबाहेर काढल्याने ८ वर्षांपासून वणवण फिरणाऱ्या वाघमारे यांना वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी आधार दिला आहे. तसेच पोलिसांकडून मदत मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
आमदार लव्हेकर यांच्या संकल्पनेतून खास पोस्टर येथील ज्येष्ठ नागरिकांनी तयार केले असून, ‘आपल्या वडिलांची माफी माग आणि त्यांना सन्मानाने घरी परत घेऊन जा’ असा आशय त्या पोस्टरमध्ये आहे. हे पोस्टर वर्सोवा, चार बंगला, सात बंगला येथे लागले आहे.
प्रभाव लोकमतचा
शंकर वाघमारे यांना उदरिनर्वाहासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. कोणाला स्वत:चे पोट्रेट किंवा स्केच काढून हवे असेल तर कृपया शंकर वाघमारे यांना ९८२०७४००४२ संपर्कसाधावा आणि त्यांना पोट्रेट किंवा स्केच काढल्याच्या मोबदल्यात स्वेच्छेने आर्थिक मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन करण्यात आले.