अस्वच्छता करणाऱ्यांना ५० लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 03:15 AM2019-07-29T03:15:28+5:302019-07-29T03:16:03+5:30
कचरामुक्त मुंबई अभियान : २४ विभाग कार्यालयांमध्ये क्लीनअप मार्शल एजन्सींची नेमणूक
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये क्लीनअप मार्शल एजन्सींची नेमणूक करण्यात आली असून, ‘कचरामुक्त मुंबई’च्या दिशेने प्रयत्न करणाºया महापालिकेने १ ते २३ जुलैदरम्यान अस्वच्छता करणाºया १९ हजार ७५२ व्यक्तींवर कारवाई करून ५० लाख ७९ हजार १०० रुपये दंड वसूल केला.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया व्यक्तींवर कार्यवाहीसाठी महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये प्रत्येकी १ पथक, यानुसार एकूण २४ फिरत्या उपद्रव शोधपथक पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे कारवाई व दंड वसुली करण्यात येत आहे. पथकांमध्ये कामगार व कर्मचाºयांसह विविध खात्यांतील अधिकाºयांचा समावेश आहे. नाल्यांलगतच्या झोपडपट्टी परिसरातून नाल्यांमध्ये कचरा पडू नये म्हणून क्लीनअप मार्शल तसेच उपद्रव शोधकांची नेमणूक करण्यात आली आहे. जून २०१९ पासून नाल्यांमध्ये कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. यानुसार १ ते २३ जुलै या २३ दिवसांच्या कालावधीदरम्यान सुमारे ५ हजार ४०० व्यक्तींवर कारवाई करून ९ लाख ८८ हजार ७०० दंड वसूल करण्यात आला. वर्दळीच्या ठिकाणी परिसर अस्वच्छ करणाºयांवर कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत १४ हजार ३७६ व्यक्तींवर कारवाई करून ३९ लाख ७७ हजार ४०० दंड वसूल करण्यात आला आहे. १ ते २३ जुलै या २३ दिवसांच्या कालावधीदरम्यान एकूण १९ हजार ७५२ व्यक्तींवर कार्यवाही करून ५० लाख ७९ हजार १०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
शून्य कचरा उद्दिष्ट
च्प्रत्येक पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतीमध्ये स्वच्छता आणि कचरा वर्गीकरण यासाठी विशेष मोहीम राबवून शून्य कचरा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृती आराखड्याची अंमलबजावणी संयुक्तपणे व लोकसहभागातून केली जाणार आहे.
वस्ती स्वच्छता प्रबोधन
मनपा आणि पोलीस प्रत्येक पोलीस ठाण्याच्या नाल्यांशेजारील अथवा पाणथळ सभोवताल परिसरातील एक वस्ती स्वच्छता प्रबोधनासाठी दरमहा दत्तक घेणार आहेत. परिणामी, नाल्यात टाकल्या जात असलेल्या कचºयास प्रतिबंध केला जाईल.
संयुक्त अभियान
सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर पडणारा कचरा बंद करण्यासाठी मनपा, पोलीस, नागरिक, युवक आणि लोकप्रतिनिधींच्या सहभागातून स्वच्छता व कचरा वर्गीकरणासाठी संयुक्त अभियान सुरू करण्यात येत आहे.
सीसीटीव्हीचा उपयोग
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाºयांवर मनपा व पोलीस कायदा अंतर्गत कारवाई मोहीम राबविण्यात येणार आहे. रस्त्यावर कचरा टाकणाºया व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेºयांचा उपयोग करण्यात येईल.