कानून के हाथ इतने लंबे हो गये ?, संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 11:46 AM2021-12-13T11:46:38+5:302021-12-13T11:47:12+5:30
राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यानुसार, आता दिल्लीतील पोलीस ठाण्यात संजय राऊत यांनी वापरलेल्या अपशब्दाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मुंबई - भाजप नेते आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर महिला आघाडी आक्रमक झाली आहेत. त्यामुळे सध्या भाजपा नेते आणि शिवसेना खासदार संजय राऊत आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. संजय राऊतांनी वापरलेल्या 'त्या' शब्दाला भाजपकडून जोरदार आक्षेप घेतला होता. याप्रकरणी आता राजधानी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती देताना, इस कानून के हात इतने लंबे हो गये? असे म्हटलंय.
राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यानुसार, आता दिल्लीतील पोलीस ठाण्यात संजय राऊत यांनी वापरलेल्या अपशब्दाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आपण आपल्या शब्दापर ठाम असून, काय तक्रार करायची ती करा, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी भाजपला सुनावले आहे.
भाजपाकडून महाराष्ट्रात होत असलेल्या बालिश राजकारणाबद्दल आम्ही Morovr हा शब्द वापरला होता. मात्र, याप्रकरणी माझ्याविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल झालाय. हे म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या केससारखंच आहे. जेथे पटना पोलिसांनी मुंबईत घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल केला होता. इस शासन काल मे कानून के हाथ इतने लंबे हो गये? OMG असा सवाल यांनी राऊत यांनी विचारला आहे. संजय राऊतांनी मीडियाशी संवाद साधताना टीकाकारांना '**या' असा शब्द वापरला होता. त्यानंतर भाजपने त्यावर आक्षेप घेऊन राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
Morovr, these words wr used for childish politics by some imported BJP ldrs in Mah'tra. But case is regsistrd in Delhi ? This is similr to SSR case, whr Patna Police registrd case abt what happnd in Mumbai.
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 13, 2021
इस शासन कालमे कानून के हाथ इतने लंबे हो गये?OMG
दरम्यान, या अशिक्षित आणि अडाणी लोकांना काही कळत नाही. हे लोक हिंदी भाषेचा फार आग्रह धरत असतात, पण राष्ट्र भाषेचे काही शब्दकोश पाहिले तर मी वापरलेला शब्द चुकीचा नसून त्याचा अर्थ अनेक ठिकाणी मूर्ख असा आहे, असं संजय राऊत म्हणाले. राऊत पुढे म्हणाले की, टीकाकारांनी अभ्यास केला पाहिजे. मला वाटले होते भाजप हा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. त्यांचे वाचन चांगले आहे. ते रामभाऊ म्हाळगी सारखी संस्था चालवतात. तिथे सुक्षित कार्यकर्ते निर्माण करतात, असं वाटत होतं. पण अशा प्रकारचे कार्यकर्ते ते निर्माण करतात हे मला माहीत नव्हतं, असा चिमटा त्यांनी काढला.