मुंबई - भाजप नेते आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर महिला आघाडी आक्रमक झाली आहेत. त्यामुळे सध्या भाजपा नेते आणि शिवसेना खासदार संजय राऊत आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. संजय राऊतांनी वापरलेल्या 'त्या' शब्दाला भाजपकडून जोरदार आक्षेप घेतला होता. याप्रकरणी आता राजधानी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती देताना, इस कानून के हात इतने लंबे हो गये? असे म्हटलंय.
राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यानुसार, आता दिल्लीतील पोलीस ठाण्यात संजय राऊत यांनी वापरलेल्या अपशब्दाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आपण आपल्या शब्दापर ठाम असून, काय तक्रार करायची ती करा, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी भाजपला सुनावले आहे.
भाजपाकडून महाराष्ट्रात होत असलेल्या बालिश राजकारणाबद्दल आम्ही Morovr हा शब्द वापरला होता. मात्र, याप्रकरणी माझ्याविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल झालाय. हे म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या केससारखंच आहे. जेथे पटना पोलिसांनी मुंबईत घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल केला होता. इस शासन काल मे कानून के हाथ इतने लंबे हो गये? OMG असा सवाल यांनी राऊत यांनी विचारला आहे. संजय राऊतांनी मीडियाशी संवाद साधताना टीकाकारांना '**या' असा शब्द वापरला होता. त्यानंतर भाजपने त्यावर आक्षेप घेऊन राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.