मुंबई : गेल्या काही वर्षात शहर आणि उपनगरातील निवासी आणि अनिवासी क्षेत्रत आगीच्या घटनांत वाढ होत आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी फायर अॅक्टनुसार सर्व आस्थापनांना फायर ऑडिट करणो बंधनकारक असल्याने संबंधितांनी इमारतींचे दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट करावे, असे आवाहन केले आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या वार्षिक कवायत स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी सीताराम कुंटे बोलत होते. ते म्हणाले, महापालिका अग्निशमन दल हे जगातील एक उत्कृष्ट प्रकारचे दल असून, त्याची तुलना ही भारतातील नव्हे तर जगातील पाश्चिमात्य विकसित शहरांच्या दलाशी केली जाते; याचे कारण दलातील प्रत्येक अधिकारी व जवान हे साहित्य सफाईदारपणो वापरण्याचे प्रशिक्षण घेत असतो. त्यामुळेच हे दल उत्कृष्ट कामगिरी करीत असते. अग्निशमन दलातील जवान व अधिकारी प्रत्येक संकट सांघिक भावनेच्या माध्यमातून सोडवितात. त्यामुळे हे दल आग विझविण्याची कामे अत्यंत समर्थपणो करीत असते. अशा वार्षिक अग्निकवायत स्पर्धामुळे त्यांच्यामध्ये जोश निर्माण होतो व त्यांच्याकडून आपत्कालीन संकटसमयी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली जाते. अग्निशमन दलाच्या गरजांकडे व अत्याधुनिकीकरणाकडे पालिका प्रशासन लक्ष देत असून, या दलाची बळकटी करण्यास प्राधान्य दिले आहे. (प्रतिनिधी)
मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता आणखी लागणा:या अग्निशमन केंद्रांच्या उभारणीबाबत प्रशासनाने मास्टर प्लॅन बनविला असून, 9क् मीटर्सची सर्वात उंच शिडी तसेच रासायनिक धोकादायक प्रसंगी अमलात आणावयाच्या उपाययोजनांसाठीही पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. झोपडपट्टीला लागलेल्या आगीप्रसंगी अग्निशमन दलास अरुंद जागेतून मार्ग काढावा लागतो. अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्याचाही महापालिकेचा मानस आहे.