Join us  

BREAKING: मुंबईत हिरापन्ना मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दल पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 4:04 PM

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या हिरापन्ना मॉलमध्ये भीषण आग लागली आहे.

मुंबई-

मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या हिरापन्ना मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. आग आज दुपारी ३.१५ च्या सुमारास लागल्याची माहिती समोर आली आहे. आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट दूरवरुनही दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या पोहोचल्या आहेत. तसंच मुंबई पोलीस आणि रुग्णवाहिका देखील पोहोचली आहे. मॉलमधून मोठ्या प्रमाणात आगीच्या धुराचे लोट बाहेर येत आहेत. मॉलमध्ये कुणी नागरिक अडकले आहेत का? याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

टॅग्स :आगमुंबई