वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीतील भीषण आगीवर नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 11:44 AM2018-10-30T11:44:19+5:302018-10-30T14:12:03+5:30
वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई - वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीतील भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. अग्निशामक दलाच्या 10 ते 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. वांद्रे पश्चिमेकडील लालमाती परिसरात ही आग लागली असून 50 हून अधिक झोपड्या या परिसरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
#Visuals: Level-3 fire breaks out in a slum at Lalmati, opposite Bandra Fire Station on Nagardas Road. 9 Fire tenders at the spot. #Mumbaipic.twitter.com/awQZXWeu2y
— ANI (@ANI) October 30, 2018
नर्गीस दत्तनगरमध्ये लागलेली ही आग तिसऱ्या श्रेणीची असून, आग वाऱ्यासारखी पसरत आहे. दाटीवाटी वस्ती आणि चिंचोळ्या गल्ल्यांमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी येत आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट उठत आहेत.
Avoid off ramp near Bandra Reclamation, big fire looks like originated from the shanty under the bridge. #mumbai#bandrapic.twitter.com/w0FB5o56bm
— Mike Melli (@mikemelli) October 30, 2018
मंगळवारी (30 ऑक्टोबर) सकाळी नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग भडकल्याची माहिती मिळत आहे. याआधी ऑक्टोबर 2017 मध्ये वांद्रेमधील गरीबनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली होती. या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.
Mumbai: Level-3 fire breaks out in a slum at Lalmati, opposite Bandra Fire Station on Nagardas Road. 9 Fire tenders at the spot. #Maharashtrapic.twitter.com/yRKncX5MoC
— ANI (@ANI) October 30, 2018
Looks like a big fire in Bandra. :(
— Sagar Godbole (@saggod) October 30, 2018
I hope everyone is safe. pic.twitter.com/1AQ1Twfyft