दादरमध्ये पोलीस वसाहतीतील इमारतीत सिलिंडरच्या स्फोटामुळे आग; 15 वर्षीय मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 04:06 PM2019-05-12T16:06:49+5:302019-05-12T16:14:23+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात
Next
मुंबई: दादर पश्चिमेला असलेल्या पोलीस वसाहतीमधल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत एका मुलीचा मृत्यू झाला आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही आग लागली. यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या, एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेली ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. या आगीत तीन घरांचं नुकसान झालं.
Mumbai: The girl who died in a fire at a building at Dadar Police Station Compound, Dadar (West), is 15-year-old, not 10 as reported earlier. #Maharashtrahttps://t.co/ZBOeuWYZe9
— ANI (@ANI) May 12, 2019
पोलीस वसाहतीमधल्या क्रमांक पाचच्या इमारतीत दुपारच्या सुमारास सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. यात श्रावणी चव्हाण या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी श्रावणी घरी एकटी होती. तिच्या कुटुंबातले इतर सदस्य बाहेरुन कुलूप लावून लग्न सोहळ्याला गेले होते. आगीत होरपळून श्रावणीचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.