मुंबईच्या प्रभादेवी येथील एका इलेक्ट्रीक वायर गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे 15 बंब दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भांडूपच्या मॉलमधील कोविड हॉस्पिटलला लागलेली भीषण आग विझत नाही तोच प्रभादेवीमध्ये आग लागल्याने खळबळ उडाली आहे. (Maharashtra: Fire breaks out at a godown of electric wires in Prabhadevi area of Mumbai. )
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले आहे. यामुळे अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. पुण्यातही मध्यरात्रीच्या सुमारास कॅम्पमधील फॅशन स्ट्रीटला आग लागली होती. यामध्ये 500 च्या आसपास असलेली छोटी छोटी दुकाने जळून खाक झाली आहेत. तर भांडूपच्या सनराईज कोविड हॉस्पिटलच्या आगीत 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कोरोनाबळी असल्याचे सांगितले जात आहे.
प्रभादेवीच्या आगीत अद्याप कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. वीर सावरकर रोडवरील गॅमन हाउसला ही आग लागली आहे. ही पाच मजली इमारत असून बेसमेंटला आग लागली आहे.